maratha warrior tanaji malusare memories celebration sinhgad
maratha warrior tanaji malusare memories celebration sinhgad

Video: नरवीर तानाजी मालुसरेंच्या शौर्याचा बेलभंडारा उधळत जागर!

खडकवासला (पुणे) : 'हर हर महादेव'चा गजर करीत 'बेल भंडारा' उधळून नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या शौर्याचा जागर सिंहगडाच्या श्रीअमृतेश्वराच्या मेटावर रविवारी रात्री पार पडला. तान्हाजी व सूर्याजी ज्या वाटेने अष्टमीच्या रात्री गडावर आले. त्या दोन्ही वाटेचा रात्रीच्या अंधारातील थरार मावळ्यांनी अनभुवला.

सिंहगडावर चढाई करण्यापूर्वी 
मालुसरेंनी खंडोजी नाईकांकडून गडावरील माहिती मिळवण्यासाठी श्रीअमृतेश्वराच्या मेटावर गोंधळ्याच्या वेशात जागरण गोंधळ केला होता. तेंव्हा पासून येथे माघ वद्य अष्टमीच्या रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम येथील सरनाईक जोरकरांच्या वतीने आयोजन केले जाते. जोरकर परिवारातील हरी, दत्ता, भानुदास, अनिल, गणेश, दिपक, आदित्य, मारुती, विकास, भानुदास, अनिल, दीपक, सुनील, हरिश्चंद्र, बायडाबाई, विश्रांती, हौसाबाई, सुगंधा विश्रांती, पौर्णिमा, रंजना यांनी आयोजन केले होते. जोरकरांचे नातेवाईक पढेर, लांघे, सुपेकर, सांबरे, सांगळे वारुंडे व खामकर उपस्थित होते. शांताराम लांघी, संताजी खामकर, गणेश वारूंडे, वैभव खामकर, नितीन वारूंडे यांचा ही आयोजनात सहभाग होता. संतोष पायगुडे, उमेश पायगुडे, तानाजी थोपटे, अमोल पढेर, दादा पढेर, सिंहगडचे इतिहास अभ्यासक नंदकिशोर मते, अशोक सरपाटील, शिल्पकार दीपक थोपटे हे प्रमुख उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सिंहगड पावित्र्य मोहिमेच्या वतीने अष्टमीच्या रात्री तान्हाजी, सूर्याजी यांच्या रस्ताने ट्रेक करून मानवंदना दिली. महेश मोकाशी, सुनीत लिंबोरे, सुधीर धावडे, प्रवीण पोकळे, वैभव बोरगे, संतोष मालुसरे, डॉ. सौरभ निंबाळकर यांच्यासह 28जण सहभागी होते. रात्री साडेदहा वाजता समाधीला अभिवादन करून तान्हाजी कड्याने खाली उतरले. श्रीअमृतेश्वर मेटावरील जागरण गोंधळास उपस्थित लावली. जागरण गोंधळात बारा वाजता हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचा जयघोष करीत बेलभंडारा उधळला. नरवीरांच्या शौर्याचे कथन जागरण गोंधळ्याने केले. तेथून रात्री एक वाजता निघून कळकीचे मेट मार्गे कल्याण दरवाजाने गडावर साडेतीन वाजता नरवीरांच्या समाधीस्थळी पोचले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आठवणीत राहणारा थरार
आठ वर्षांची अस्मिता मते, तेरा वर्षाची संस्कृती कापसे, चौदा वर्षाचा अर्जित थोपटे, एकोणीस वर्षाच्या कनिष्का थोपटे, अंजली बरगुडे सहभागी झाले होते. त्यांनी सांगितले की, कड्यावरून उतरताना पाय ठेवायला चार बोटांची जागा होती. गडावर जाताना अवघ्या एकवित पायवाटेने जागेतून आम्ही प्रवास केला. एका बाजूला दरी दुसऱ्या बाजूला डोंगर कडा होता. असा थरार आठवणीत राहणारा होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com