दुबईत अडकलेल्यांसाठी मराठी उद्योजकाने केली विशेष विमानाची व्यवस्था

dubai
dubai
Updated on

पुणे, ता. 13 : लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून दुबईमध्ये अडकून पडलेले राज्यातील नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदार यांना पुन्हा आणण्यात एका मराठी उद्योजकाला अखेर यश आले. त्यांना परत आणण्यात सरकारी पातळीवर केलेल्या प्रयत्नाला अपयश आल्यानंतर खचून न जाता विशेष विमानांची व्यवस्था करून या सर्वांना परत मायभूमी आणण्यात येत आहे.आत्तापर्यत 400 नागरिकांना राज्यात आणले असून त्यात गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी असलेले आणि त्यांच्या घरातील व्यक्ती आजारी आहे, अशा लोकांना परत आणण्यात प्राधान्याने पाठवण्यात येत आहे.

कामानिमित्त संयुक्‍त अरब अमिरातीतील दुबई, अबुधाबी, शारजाह येथे स्थाईक झालेल्या महाराष्ट्रीयन नागरिकांची संख्या मोठी आहे. लॉकडाउनमध्ये महाराष्ट्रीयन कामगार, मजूर, व्यापारी व त्यांचे कुटुंबीय गेले अडीच महिने तिथे अडकून पडले आहेत. त्यांना  महाराष्ट्रात पुन्हा जाता यावे, यासाठी दुबई येथे वास्तव्यास असलेले कोव्हनंट ग्रुपचे संस्थापक व गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे (जीएमबीएफ) उपाध्यक्ष राहुल तुळपुळे यांनी हा पुढाकार घेतला आहे. तुळपुळे यांच्या प्रयत्नातून आतापर्यंत प्रत्येकी एक विमान पुणे आणि मुंबईत दाखल झाले आहे. तर आणखी एक विमान आज (रविवार) पुण्यात येणार आहे.

दुबईत अडकलेल्यांना महाराष्ट्रात जाण्यासाठी थेट विमान नसल्याचे समजल्यानंतर तुळपुळे यांनी हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी राज्यातील सरकार आणि दुबईमधील भारताचे दूतावास विपुल यांच्याकडे विशेष विमानासाठी पाठपुरावा सुरू केला. त्यांना त्याबाबत परवानगी मिळाली. त्यानंतर दुबईमधील एका खासगी विमान कंपनीच्या माध्यमातून अडकलेल्या नागरिकांचा मायभूमीत जाण्याचा मार्ग मोकळा झाला. तिकिटाचे पैसे संबंधित प्रवासी देत असून त्यांना पूर्ण पैसे देणे शक्य नाही त्यांना जीएमबीएफच्या माध्यमातून मदत देखील करण्यात येत आहे.

मुंबईला जाण्यासाठी आठ हजार 500 तर पुण्यासाठी दीड हजार नागरिकांनी नोंदणी केली आहे. त्यातील सहा ते सात हजार नागरिक प्रत्यक्षात प्रवास करतील अशा आमचा अंदाज आहे. त्यासाठी 20 ते 30 विशेष विमानांची गरज आहे, असे तुळपुळे यांनी सांगितले. धनश्री वाघ-पाटील आणि शुभंगी साका या परतीसाठी इच्छुक नागरिकांशी समन्वयाचे काम करत आहेत. या नागरिकांना तात्पुरत्या निवासाची सोय, किराणा माल आणि इतर गरजेच्या वस्तू उपलब्ध करून देण्यात त्यांनी तुळपुळे यांना सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com