मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथदिंडी, व्याख्याने, काव्यमैफील

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 February 2020

सारस्वतांच्या मादियाळीत रंगलेल्या काव्यमैफिली आणि व्याख्याने, मातृभाषेशी नुकतेच अवगत झालेल्या चिमुरड्यांची भाषादिंडी, तर मराठीच्या अभ्यासकांची ग्रंथदिंडी आणि मराठीप्रेमींच्या रांगोळीपासून स्वाक्षरीपर्यंत अभियाने, अशा उपक्रमांनी मराठी भाषा दिन पुण्यनगरीत उत्साहात साजरा करण्यात आला.

पुणे - सारस्वतांच्या मादियाळीत रंगलेल्या काव्यमैफिली आणि व्याख्याने, मातृभाषेशी नुकतेच अवगत झालेल्या चिमुरड्यांची भाषादिंडी, तर मराठीच्या अभ्यासकांची ग्रंथदिंडी आणि मराठीप्रेमींच्या रांगोळीपासून स्वाक्षरीपर्यंत अभियाने, अशा उपक्रमांनी मराठी भाषा दिन पुण्यनगरीत उत्साहात साजरा करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलमध्ये मराठी पाट्या, हस्ताक्षर स्पर्धा, पुस्तकवाचन यातून मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला आहे. तसेच, एस. एम. जोशी हिंदी माध्यमिक विद्यालयात कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शाळेत दोन हजार मराठी पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. पौड रस्ता येथील सहस्रबुद्धे विद्यामंदिरात कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. विशेष म्हणजे, ‘कवितांची शाळा’ हा संग्रह मुलांनी लिहिलेल्या कवितांचा आहे. बालचित्रवाणीचे निर्माते ज्योतिराम कदम, पर्यवेक्षिका प्रतिभा खाडे, वसंत बिवरे उपस्थित होते. कार्यक्रमात मुलांनी आपल्या निवडक कविता म्हणून दाखविल्या होत्या. उषा यादव आणि रेश्‍मा बांदल यांचे विशेष सहकार्य लाभले.

पुण्यातील 'या' रस्त्याचे काम कासवगतीने

सूत्रसंचालन सुचिता चव्हाण यांनी केले. रेवजी औटी यांनी आभार मानले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्वष्टा कांसार समाज वाचन मंदिराच्या ग्रंथालयाच्या विश्वस्तांचा आणि ग्रंथपालांचा सन्मान करण्यात आला. तसेच, ग्रंथालयास बालसाहित्याची काही पुस्तके भेट देण्यात आली.

अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या करिअरला नवे वळण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi language day celebration in pune