नवस फेडून परतताना काळाने घातला घाला

बाबा तारे
शनिवार, 27 जानेवारी 2018

औंध : गणपतीपुळे येथील नवस फेडून येथून कोल्हापूरहून पुण्याला येत असताना भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील बारा जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना काल (शुक्रवारी) रात्री कोल्हापूर येथे घडली. 

औंध : गणपतीपुळे येथील नवस फेडून येथून कोल्हापूरहून पुण्याला येत असताना भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील बारा जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना काल (शुक्रवारी) रात्री कोल्हापूर येथे घडली. 

यामध्ये संतोष बबन वरखडे (45) आणि त्यांच्या दोन मुली गौरी संतोष वरखडे (16) व ज्ञानेश्वरी संतोष वरखडे (14), सचिन भरत केदारी (34) यांची पत्नी नीलम सचिन केदारी (28) मुलगी संस्कृती सचिन केदारी (8) व मुलगा सान्निध्य सचिन केदारी (9 महिने) सचिन यांच्या वहिनी भावना दिलीप केदारी (35), पुतण्या साहिल दिलीप केदारी (14), पुतणी श्रावणी दिलीप केदारी(11), बहिण छाया दिनेश नांगरे(41) भाचा प्रतिक दिनेश नांगरे(14) व चालक महेश कुचेकर  (28) (रा.हिंजवडी) यांचा सर्वांचा मृत्यू झाला आहे तर सचिन यांची बहिण मनिषा संतोष वरखडे (38) यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर भाची प्राजक्ता दिनेश नांगरे (18) व आई मंदा भरत केदारी(60) या किरकोळ जखमी झाल्या आहेत.

केदारी कुटुंब हे दरवर्षी गणपतीपुळेला दर्शनाला जात असत. सचिन केदारी व कुटुंबीयांनी गणपतीपुळे येथे मुलासाठी नवस केलेला होता. त्यांना सात वर्षानंतर मुलगा झाला असल्याने नवस फेडण्यासाठी दोन्ही बहिणींच्या कुटुंबासह ते खाजगी ट्रॅव्हलच्या मिनी बसने गणपतीपुळ्याला गेले होते. तेथील नवसाचे सर्व कार्य उरकून रात्री कोल्हापूरमार्गे पुण्याकडे येत असताना शिवाजी पुलावरून बस नदीत पडून सर्वांचा मृत्यू झाले. या दुर्घटनेमुळे बालेवाडी गावात सर्वत्र शोककळा पसरली होती. बालेवाडी पंचक्रोशीत एखाद्या कुटुंबातील एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यु होण्याची पहिलीच घटना असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Marathi News Pune news Accident 12 death car accident