बंगळूर-मुंबई महामार्गावर अपघातात एक ठार, दोन जखमी

बाबा तारे
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

औंध (पुणे) : बंगळूर-मुंबई महामार्गावरील बाणेर येथे रात्री (मंगळवारी) साडेबाराच्या सुमारास चार मालवाहू ट्रक व एक गॅसचा टँकर एकमेकांना धडकल्याने या अपघातात एक चालक ठार तर दोन जण जखमी झाले.

साता-याहून मुंबईकडे या सर्व मालवाहू ट्रक एकामागे एक जात असतांना ननावरे वस्ती येथील उड्डाणपुलावर आल्यानंतर टी.एन.52-जे1848 या कंटेनर चालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले. भरधाव वेगात कंटेनर चालवल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व यात हा कंटेनर गॅसच्या टँकरला जाऊन धडकला.

त्याचबरोबर मागून येत असलेल्या टी.एन.52-एच7166, एम.एच.04-जीआर.6293 आणि एम.एच.46-एएफ8711 हे सर्व कंटेनरला धडकले. अचानक सर्वच वाहने एकमेकावर आदळल्याने या अपघातात चालक लोकमान खान (21 वर्षे रा.रायपूर, हरियाणा) याचा जागीच मृत्यु झाला तर दोन जण जखमी झाले.

या अपघातात चारही वाहनांचे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे रात्रीपासून दुपारी बारापर्यंत वाहतूक कोंडी झाल्याने महामार्गावरील वाहतूक संथगतीने होत होती.

साता-याकडून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक काही प्रमाणात सेवा रस्त्याने वळवण्यात आल्याने काही प्रमाणात कोंडी करण्यात आली होती.

हिंजवडी वाहतूक पोलीसांनी या अपघातातील सर्व वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला घेऊन महामार्ग मोकळा केला व वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद हिंजवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

Web Title: marathi news pune news Bangalore Mumbai Highway