
Marathi Sahitya Sammelan
Sakal
पुणे : सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड रविवारी (ता. १४) होणार असून, संमेलनाच्या तारखा व रूपरेषाही जाहीर होणार आहे. एकेकाळच्या मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या साताऱ्यात होत असलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या गळ्यात पडण्याचा योग जुळून येण्याची शक्यता दाट आहे.