शुभमंगलनंतर सावधान! विभक्त होण्यासाठी ४,५१५ दावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Divorse

संसाराचा गाडा थांबविण्यासाठी दाखल झालेल्या या दाव्यांत घटस्फोट, विवाह रद्द करण्यासाठी आणि परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठीच्या तक्रारींचा समावेश आहे.

शुभमंगलनंतर सावधान! विभक्त होण्यासाठी ४,५१५ दावे

पुणे - कोरोनामुळे (Corona) निर्माण झालेली स्थिती, सतत घरी असल्याने जोडप्यांत (Couple) निर्माण झालेले वाद (Dispute) आणि मार्च २०२० नंतर न्यायालयीन कामकाजावर कोरोनाचा झालेल्या परिणामांमुळे (Effect) गेल्या वर्षी येथील कौटुंबिक न्यायालयात (Family Court) कायमचे विभक्त होण्यासाठी चार हजार ५१५ दावे दाखल झाले आहेत. २०१७ नंतर दाखल झालेले हे सर्वाधिक दावे आहेत.

संसाराचा गाडा थांबविण्यासाठी दाखल झालेल्या या दाव्यांत घटस्फोट, विवाह रद्द करण्यासाठी आणि परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठीच्या तक्रारींचा समावेश आहे. त्यातील नव्याने दाखल व प्रलंबित असलेले दोन हजार ८७६ दावे निकाल काढण्यात आले आहेत. याबाबत कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशक स्मिता दाते यांनी सांगितले की, घटस्फोटाकडे बघण्याची मानसिकता आता बदलत आहे. पटत नसेल तर दुसऱ्या व्यक्तीबरोबर नवीन वैवाहिक आयुष्य सुरू करण्यावर भर असल्याचे दिसते.

विभक्त होण्याचे दावे वाढण्यामागील कारणे

  • जमलं तर टिकवा नाहीतर मिटवा प्रवृत्ती वाढतेय

  • एकमेकांना पुरेसा वेळ दिला जात नाही

  • थोडे खटके उडाले तरी टोकाचे निर्णय घेतले जातात

  • घटस्फोट हा आता कलंक राहिला नाही

  • घटस्फोट मिळण्याची प्रक्रिया जलद झाली आहे

हेही वाचा: पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या खर्चाचा मेळच नाही

कोरोनाचा काय परिणाम झाला?

  • याकाळात घरातील व्यक्ती सर्वात जास्त वेळ एकत्र होत्या

  • त्यामुळे एकमेकांचे दोष जास्त दिसू लागले

  • सततच्या मतभेदांमुळे समजून घेणे अवघड झाले

  • घरातील एकमेकांच्या चुका लक्षात येण्याचे प्रमाण वाढले

  • चुका शोधून काढण्याची सवय वाढली

प्रलंबित प्रकरणे निकाली करताना संख्यात्मक दृष्टिकोन न ठेवता गुणात्मक बाबीचा विचार करून न्यायनिवाडा केला जातो. उभय पक्षकारांत तडजोडीने सुवर्णमध्य साधण्यासाठी सर्व न्यायाधीश, समुपदेशक व मध्यस्थ प्रयत्नशील आहेत.

- सुभाष काफरे, प्रमुख न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय

तुम्हाला काय वाटते?

कायमचे विभक्त होण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात जे दावे दाखल होत आहेत ते चिंताजनक आहेत. याबाबत आपले मत नावासह व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवा - ८४८४९७३६०२

Web Title: Marriage Divorse Cases Increase Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top