डॉ. जोशी, डॉ. अवचट यांना मसाप जीवनगौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jeevangaurav Award

डॉ. जोशी, डॉ. अवचट यांना मसाप जीवनगौरव

पुणे - महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ‘मसाप जीवनगौरव पुरस्कार’ (Masap Jeevangaurav Award) साहित्यिक डॉ. न. म. जोशी (२०२०) आणि डॉ. अनिल अवचट (२०२१) यांना जाहीर झाला आहे. वाड्मयीन चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल परिषदेचा डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार डॉ. सुनीलकुमार लवटे, कोल्हापूर (२०२०) आणि मोहन रेडगांवकर, इंदूर (२०२१) यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. (Masap Jeevangaurav Award Declare)

‘मसाप’च्या ११५ व्या वर्धापनदिना निमित्ताने पुरस्कार जाहीर केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘डॉ. जोशी आणि डॉ. अवचट यांना लेखनातून केलेल्या साहित्य सेवेबद्दल मसाप जीवनगौरव पुरस्कार तर डॉ. लवटे आणि रेडगांवकर यांनी वाचन आणि साहित्य चळवळ गतिमान करण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.’’

हेही वाचा: पुणे : म्युकरमायकोसिसवरील औषधांचा रुग्णालयांना पुरवठा सुरु

गेल्यावर्षी आणि यंदा टाळेबंदीमुळे ग्रंथ आणि ग्रंथकार पुरस्कारांसाठी अनेक प्रकाशकांना आणि लेखकांना त्यांची पुस्तके पाठविता आली नाहीत. तसेच, कोरोनामुळे परीक्षकांची समिती नियुक्त करणे, त्यांच्या बैठका होऊन पुस्तकांची निवड करणे ही प्रक्रिया पार पाडणे शक्य झाले नाही. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठीची तसेच उत्कृष्ट शाखा व कार्यकर्ता पुरस्कारसाठीची प्रक्रिया पार पाडून पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल. सर्व पुरस्कार परिस्थिती अनुकूल असल्यास समारंभपूर्वक देण्यात येतील; अन्यथा पोस्टाद्वारे ते घरपोच पाठविण्यात येतील, याची लेखक, प्रकाशक आणि देणगीदारांनी नोंद घ्यावी, असे प्रा. जोशी यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top