पुणे : आता उद्योगनगरीत महागणार पाणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

पिंपरी : समन्याय पद्धतीने पाणी वितरणासाठी सध्या शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, उंच भागातील नागरिकांना कमी व उताराच्या भागातील नागरिकांना जादा पाणी मिळत आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय वाढला आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने बुधवारी (ता. 5) होणाऱ्या स्थायी समिती सभेसमोर ठेवला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या घरगुती वापरासाठी दरमहा सहा हजार लिटरपर्यंत मोफत पाणी दिले जात आहे. सहा हजार ते 20 हजार लिटरपर्यंत 4 रुपये 20 पैसे प्रतिहजार लिटरने तर 20 हजार लिटरच्या पुढे आठ रुपये 40 पैसे प्रतिहजार लिटरसाठी पाणीपट्टी आकारणी केली जात आहे. प्रस्तावित दरानुसार सहा हजार लिटरपर्यंत मोफत पाणी मिळेल. मात्र, सहा ते 15 हजार लिटरपर्यंत आठ रुपये, 15 ते 20 हजार लिटरपर्यंत 40 रुपये आणि 20 हजार लिटरच्या पुढील पाणी वापरासाठी प्रतिहजार लिटरसाठी 100 रुपये पाणीपट्टी आकारली जाणार आहे. 

पाकिस्तानीच म्हणतात, 'सरकार लाज वाटू द्या, भारताकडून काहीतरी शिका'

मात्र, झोपडपट्टीतील नळजोड धारकांना सध्या सहा हजार लिटरपर्यंत मोफत पाणी दिले जात आहे. सहा हजार ते 15 हजार लिटरपर्यंत दोन रुपये 10 पैसे प्रतिहजार लिटरने तर 15 ते 20 हजार लिटरसाठी तीन रुपये 15 पैसे प्रतिहजार लिटरसाठी पाणीपट्टी आकारणी केली जात आहे. प्रस्तावित दरानुसार सहा हजार लिटरपर्यंत मोफत पाणी मिळेल. मात्र, सहा ते 15 हजार लिटरपर्यंत चार रुपये, 15 ते 20 हजार लिटरपर्यंत 40 रुपये आणि 20 हजार लिटरच्या पुढील पाणी वापरासाठी प्रतिहजार लिटरसाठी 100 रुपये पाणीपट्टी आकारली जाणार आहे. 

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी वर्षाला होतात तब्बल एवढे कोटी रुपये खर्च

अन्य पाणीवापर व दर (प्रतिहजार लिटर)
- वाणिज्य (हॉटेल्स, उपाहारगृहे, दुकाने) : सध्या 52 रुपये 50 पैसे आणि प्रस्तावित दर 55 रुपये 
- खासगी शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, शासकीय-निमशासकीय कार्यालये, रेल्वे स्थानके, सरकारी रुग्णालये : सध्या 15 रुपये 75 पैसे आणि प्रस्तावित दर 17 रुपये 
- धार्मिक स्थळे, अनाथाश्रम, वृद्धाश्रीम, धर्मादाय आयुक्तांतर्गत मंडळे व महापालिका इमारती : सध्या 10 रुपये 50 पैसे; प्रस्तावित दर 11 रुपये. 
- क्रिडांगणे : सध्या 21 रुपये प्रस्तावित दर 22 रुपये

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: may water is expensive for inustrial Purpose in Pune