कदाचित चंद्रकांत पाटलांना केंद्रात मंत्री करणार असतील : अजित पवार

Chandrakant Patil Ajit Pawar
Chandrakant Patil Ajit Pawar

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केंद्रामध्ये मंत्री करणार असतील तर मला माहीत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये 'मला माजी मंत्री म्हणू नका. येत्या तीन-चार दिवसांत काय ते तुम्हाला दिसून येईल,' असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात तर्क-वितर्क लढविले जात आहेत. या संदर्भात पवार यांना विचारले असता ते म्हणाले, 'मी माझ्या कामावर लक्ष देतो. चंद्रकांत पाटलांना केंद्रात मंत्री करणार असतील तर पंतप्रधान मोदींना माहीत असेल. मी विकासकामांना प्राधान्य देतो. राज्यात महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत आहे. राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. ही परिस्थिती सांभाळून राज्यात विकासकामांकडे लक्ष देण्यात येत आहे. त्यासाठी आम्ही सकाळपासूनच कामाला लागतो.'

Chandrakant Patil Ajit Pawar
गणेश विसर्जनाला पुण्यात निर्बंध, पाहा काय आहेत नियम

राज्यपाल महामहिम आहेत, मी बोलू शकत नाही :

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोथरूड येथील सायकल रॅलीच्या कार्यक्रमात एका स्पर्धकांचा मास्क स्वतःहून काढला. कोरोनाची परिस्थिती असतानाही मास्क काढल्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. याबाबत पवार म्हणाले,''ते महामहिम आहेत. त्यांनी काही केले तर त्यावर मी बोलू शकत नाही. राज्यपालांनी आज सकाळी सहा वाजता कार्यक्रमास उपस्थित होते. त्यावर मलाही त्यांचीच सवय लागलीय, असे त्यांनी नमूद केले.''

Chandrakant Patil Ajit Pawar
दिल्ली: CBI कार्यालयाला आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

मराठा सेवा संघाला काय निर्णय घ्यायचा ते ठरवतील :

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी एका मासिकातील लेखामधून भाजपशी युती करण्याचे सूतोवाच केले आहे. या संदर्भात पवार म्हणाले,''काही संघटना राजकारणविरहित विशिष्ट उद्देशाने काम करीत असतात. अनेकांना वाटते की आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणाशी तरी युती करावी. त्यांना काय निर्णय घ्यायचा ते ठरवतील.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com