esakal | "नुसत्या टीका करण्यापेक्षा..."; भाजपचं मोहन जोशींना सडेतोड प्रत्युत्तर

बोलून बातमी शोधा

mulidhar mohol
"नुसत्या टीका करण्यापेक्षा..."; भाजपचं मोहन जोशींना सडेतोड प्रत्युत्तर
sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे

वारजे माळवाडी : ''पुण्याचे माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी कधीतरी मुंबईला जावं... कधीतरी त्यांच्या नेत्यांना भेटावे…पाच वर्षांनी एकदाच जोशी साहेब आम्हाला दिसतात. गेली वर्ष सव्वा वर्षाच्या काळात ये घरातून बाहेर पडले नाहीत. अशा लोकांनी, मला असं वाटतं की, टीका करण्यापेक्षा, तुम्ही बाहेर या, आम्हाला सुचना करा, मार्गदर्शन करावे. आम्ही आपले ऐकू. पण राजकारण करू नका'' असे उत्तर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहे.

हेही वाचा: बारामतीत तपासण्या वाढल्याने रुग्णसंख्या चारशेच्या घरात

जोशी यांनी काल भाजपवर टीका करताना म्हटले होते की, ''केंद्रात आणि महापालिकेत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून कोरोना नियंत्रणासाठी खासदार गिरीश बापट, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्र सरकारकडून पुण्याला जास्तीत जास्त सुविधा मिळवून देणे गरजेचे आहे.''

''केंद्राकडून वैद्यकीय सामग्री मिळाल्यावर त्याचे वितरण व्यवस्थित करून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. या दोन्ही आघाड्यांवर ठोस काम न करता केवळ राज्य सरकार पुण्याबाबत दुजाभाव करत असल्याचा ठपका ठेवणे आणि त्यासाठी महापालिका आयुक्तांना निवेदन देणे ही कृती म्हणजे निव्वळ बालीशपणा आहे.''असे ही जोशी यांनी म्हटले होते.

हेही वाचा: लसीकरणाला गती देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील : अजित पवार

भाजपच्यावतीने शिवणे येथे रक्तदान शिबिराला भेट देण्यासाठी महापौर आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. मोहोळ म्हणाले, ''कोरोनाच्या या परिस्थितीत खरं तर ही राजकारण करण्याची वेळ नाही. आज सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. आणि मी आवर्जून जोशी यांना सांगेन फक्त प्राथमिक आरोग्य सुविधा देणे इतकेच महानगरपालिकेचे काम असतं. पण सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी ही सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असते. आज जोशी यांचेच सरकार राज्यामध्ये आहे. येथे टीका टिपणी करण्यापेक्षा त्यांनी राज्य सरकारकडून महानगरपालिकेला, पुणेकरांना काय आवश्यकता आहे. यासाठी प्रयत्न करावेत. पुण्यामध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व रेमडिसिव्हर यांचा तुटवडा आहे. राज्यात तुमचे सरकार आहे. पुणेकरांसाठी काही तरी आणा. जोशी साहेब मोठे आहेत. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. गेली अनेक वर्षे या शहरांमध्ये ते काम करत आहेत. पण गेली वर्षभर लोक मोहन जोशी साहेब कोण आहे ते विसरले आहेत.''

हेही वाचा: 2 हजार वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र; नाणेघाटातील शिलालेखात 'महारठी' उल्लेख