
Medical Admission Scam
Sakal
पुणे : वैद्यकीय प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीत नव्याने प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रे चुकीची असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशा प्रकारे जवळपास १५२ विद्यार्थ्यांची अपलोड केलेली कागदपत्रे चुकीची असल्याचे आढळून आले. या १५२ विद्यार्थ्यांना आता महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) नोटीस पाठविली आहे.