पुरंदर विमानतळाचा प्रश्न मार्गी लागणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलावली बैठक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

या बैठकीला महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पुरंदर विमानतळासाठीच्या जागेपासून ते सर्व प्रकारच्या मान्यता यापूर्वीच केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत.

पुणे : पुरंदर तालुक्‍यात प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (दि.13) बैठक बोलविली आहे. पुरंदर विमानतळासाठी जागेचे भूसंपादन आणि शेतकऱ्यांना मोबदला देण्यासंदर्भात बैठकीत चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

सासवड : लाच घेणारा लिपिक अडकला 'एसीबी'च्या जाळ्यात; सातबाऱ्यासाठी मागितले सहा हजार रुपये!​

मुंबई येथे मंत्रालयात ही विशेष बैठक होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पुरंदर विमानतळासाठीच्या जागेपासून ते सर्व प्रकारच्या मान्यता यापूर्वीच केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत. केवळ भूसंपादन हा एक महत्त्वाचा टप्पा बाकी आहे, त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. यापूर्वी झालेल्या बैठकीत पवार यांनी पुरंदर विमानतळासाठी आवश्‍यक असलेल्या जागेचे भूसंपादन करण्याबरोबरच भूसंपादनासाठी चांगले अधिकारी नेमण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार चार उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे काम थांबले होते. तसेच भूसंपादनासाठी आवश्‍यक निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे भूसंपादनासाठी निधी कसा उभारायचा याबाबत मार्ग निघण्याची शक्‍यता आहे.

पुणे विद्यापीठाचा अजबगजब कारभार; मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना 'ऑनलाईन'मध्ये आले इंग्रजीतून प्रश्न!

भूसंपादनाच्या मोबदला देण्यासाठीचे पर्याय :
- विमानतळासाठी 2 हजार 832 हेक्‍टर जागेची आवश्‍यकता 
- भूसंपादनासाठीचे चार पर्याय 
- थेट खरेदीने म्हणजे एकरकमी मोबदला देणे. 
- शेतकऱ्यांना शेती महामंडळाची पर्याय जागा देणे. 
- मगरपट्टा सिटीच्या धर्तीवर विमानतळ विकास कंपनीमध्ये भागधारक म्हणून सहभागी करून घेणे. 
- पर्यायी शेतजमिनी देणे आणि निर्वाह भत्ता देणे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting in the presence of Deputy CM Ajit Pawar regarding Purandar Airport