
पुणे ः कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालणे, शारिरिक अंतर ठेवणे आणि हात स्वच्छ धुणे ही त्रिसूत्री अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे व्यक्ती किंवा समाजाच्या मानसिक स्वास्थ्यावरील दुष्परिणाम रोखण्यासाठी मानसिक स्वच्छतेची गरज (मेंटल हायजिन) नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्सेसच्या (एम्स) मानसशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. वैश्विक साथीचा जसा शारिरिक आरोग्यावर परिणाम होतो तसाच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. देशात मानसिक स्वच्छतेची गरज लक्षात घेता एम्सच्या डॉ. महादेव सिंग सेन, डॉ. निष्ठा चावला आणि डॉ. राजेश सागर यांनी इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोरोनाच्या साथीमुळे देशभरातील नागरिकांमध्ये औदासीन्य आणि चिंतेचे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढल्याचे डॉ. राजकुमार आर.पी. यांच्या शोधनिबंधातून पुढे आले आहे.(mental hygiene is important during corona infection says aiims)
मानसिक स्वास्थ्य म्हणजे....
ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्यातील क्षमता ओळखून त्यायोगे पुरेपूर वागू शकेल, दैनंदिन जीवनातील ताणतणावांचा सामना करू शकेल, सुफल व उत्पादनक्षमरीत्या कार्यरत राहील व समाजाप्रति योगदान देऊ शकेल.
मानसिक स्वच्छता म्हणजे....
मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्याच्या बदलत्या वातावरणानूसार किंवा आजूबाजूच्या परिस्थितीनुसार शारिरिक अवयव आणि संस्था यांच्या योग्य हालचाली करणे. मानसिक आजारात रूपांतर होणाऱ्या सवयी किंवा लक्षणांची वेळीच दखल घेऊन उपाययोजना करणे.
कोरोनामुळे बिघडलेले मानसिक स्वास्थ्य ः
१) लहान मुले ः
समस्या
- शाळा बंद असल्यामुळे मुलांच्या आकलन आणि मानसिक विकासावर परिणाम
- मुलांमध्ये अनावश्यक सवयींचा विकास होणे
- सुरक्षितता, आत्मविश्वास आणि मैत्री करण्याच्या गुणांचा अभाव
उपाय
- पालकांनी त्यांचा जास्तीत जास्त सकारात्मक वेळ मुलांना द्यावा. त्यांच्यातील विकसनशील अवस्था कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे
- लहान मुलांना आध्यात्मिक दृष्टीने शिकवण द्यावी. त्यातून आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना वाढेल
२) इतर व्यक्ती आणि आरोग्य कर्मचारी ः
समस्या
- चिंता आणि औदासिन्यात वाढ
- नेहमीचे आजारही भयंकर वाटणे
- शरीरातील बदलांवर अनावश्यक चिंता करणे
- रूग्णालयांविषयी भीती वाटणे
उपाय ः
- आरोग्य कर्मचाऱ्यांना मानसिक स्वास्थ्यासंबंधी प्रशिक्षण देणे
- अति ताणतणाव वाटल्यास ‘ब्रेक’ घेणे, आत्मविश्वास वाढविणाऱ्या उपक्रमांत सहभागी व्हा
- नवीन छंद, सामाजिक कार्य, पुस्तके आदींमध्ये मन गुंतवणे
- शैक्षणिक संस्था आणि कामाच्या ठिकाणी मानसोपचार तज्ज्ञांची नियुक्ती करणे
कोरानातून सावरलेल्या रूग्णांबरोबरच त्याचे कुटुंबीय, बेरोजगार व्यक्ती, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, लहान मुले अशा सर्वांनाच मानसिक स्वास्थ्याशी निगडित समस्या जाणवत आहे. कोरोना प्रमाणे ही पण एक वैश्विक साथ असून, रोजच्या व्यवहारात मानसिक स्वच्छतेच्या गोष्टी पाळणे गरजेचे आहे. आरोग्य यंत्रणेबरोबरच समाज घटकांनीही याकडे विशेष लक्ष द्यायला हवे.
- डॉ. राजेश सागर, मानसशास्त्र विभाग, एम्स, नवी दिल्ली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.