मेट्रो मार्गावरील टीओडी झोन संदर्भातील आदेश म्हणजे ‘वरातीमागून घोडे’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

मेट्रो मार्गावरील टीओडी झोन (ट्रान्झिट ओरिएंटेड झोन) संदर्भात नगर विकास विभागाने काढलेला आदेश म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ असा प्रकार असल्याची टीका होऊ लागली आहे. मेट्रो स्थानकाच्या पाचशे मीटर परिसरात टीओडी झोनवर हरकती-सूचनांसह सर्व प्रक्रिया पूर्ण करून नगर रचना विभागाने अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवून वर्ष झाले. नगर विकासने पुन्हा हरकती-सूचना मागविण्याचा आदेश काढला आहे.

पुणे - मेट्रो मार्गावरील टीओडी झोन (ट्रान्झिट ओरिएंटेड झोन) संदर्भात नगर विकास विभागाने काढलेला आदेश म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ असा प्रकार असल्याची टीका होऊ लागली आहे. मेट्रो स्थानकाच्या पाचशे मीटर परिसरात टीओडी झोनवर हरकती-सूचनांसह सर्व प्रक्रिया पूर्ण करून नगर रचना विभागाने अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवून वर्ष झाले. नगर विकासने पुन्हा हरकती-सूचना मागविण्याचा आदेश काढला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मेट्रो प्रकल्प आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरावा, यासाठी महापालिकेने या मेट्रो मार्गाच्या पाचशे मीटर परिसरात टीओडी झोनची शिफारस केली होती. त्यानंतर महापालिकेने त्यात बदल करून मेट्रो स्थानकाच्या पाचशे मीटर परिसरात हा झोन लागू करावा, अशी शिफारस राज्य सरकारकडे केली होती. त्यास राज्य सरकारने ८ मार्च २०१९ रोजी मान्यता दिली. तसेच त्यावर हरकती -सूचना मागविण्याची प्रक्रिया राबविण्याचा आदेश दिला.

बाहेर जाऊन येते, असं सांगून गेल्यात तीन तरुणी...चार दिवसांपासून पोलिस...

त्यानुसार राज्य सरकारच्या नगर रचना विभागाने त्यावर हरकती-सूचना मागविल्या. दाखल झालेल्या हरकती सूचनांवर सुनावणी घेऊन आपला प्रस्ताव अभिप्रायासह सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला. त्यास जवळपास वर्ष होत आले. त्यावर निर्णय घेण्याऐवजी राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने ३० जून रोजी पुन्हा आदेश काढून त्यावर  हरकती-सूचना मागविण्याची प्रक्रिया राबविण्याचा आदेश काढला आहे. 

राज्यातील महाविद्यालयांची माहिती 'ऑनलाइन' उपलब्ध व्हावी; शिक्षणमंत्र्यांकडे कुणी केली मागणी?

‘पीएमआरडीए’ने हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. हा मार्ग महापालिकेच्या हद्दीतून जातो. असे असताना पालिकेच्या विकास आराखड्यात तो दर्शविण्यात आला नव्हता. मागील वर्ष तो दर्शविण्यास शहर सुधारणा समितीने मान्यता दिली होती. परंतु राज्य सरकारकडून त्यास मान्यता मिळाली नव्हती. या मेट्रो मार्गाचा समावेश विकास आराखड्यास करण्यास नुकतीच सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गाची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे पीएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Metro Route TOD Zone Urban Development Department