बाहेर जाऊन येते, असं सांगून गेल्यात तीन तरुणी...चार दिवसांपासून पोलिस...

डी. के. वळसे पाटील
Saturday, 4 July 2020

या तीन तरुणी कोणाला आढळून आल्यास मंचर पोलिस ठाण्याशी (दूरध्वनी क्रमांक 02133- 223159  संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस नाईक एच. सी. गिलबिले यांनी केले आहे.

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील मंचर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पेठ- पारगाव, डोबी मळा– मंचर व  मेंगडेवाडी येथून १८ वर्षाच्या तीन तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. चार ते पाच दिवस शोध घेऊनही त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे मंचर परिसरात खळबळ उडाली असून, कुटुंबीय चिंतेत पडले आहेत. याबाबत संबंधित तरुणीच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 

पेट्रोल- डिझेलच्या दरावरून पुणेकरांना असाही दिलासा...

पेठ- पारगाव येथील ज्योती कैलास कडूसकर हि तरुणी रविवारी (ता. 28 जून) रोजी रात्री बाथरूमला जाते, असे सांगून घराबाहेर गेली, ती परत आली नाही. तिचे वडील कैलास कडूसकर यांनी फिर्याद दिली आहे. ज्योती हिचे वर्णन : पाच फुट दोन इंच उंची, रंग गोरा, बांधा मध्यम, सरळ नाक, काळया रंगाची पॅन्ट, कानात रिंगा, पायात चप्पल, मराठी व हिंदी भाषा बोलते.

कोंढापुरीत पर्यावराणासाठी झटताहेत ग्रामस्थ
    
डोबीमळा- मंचर येथील तरुणी सुजाता साहेबराव ननवरे ही बुधवारी (ता. 1) पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर निघून गेली होती. मंचर शहरात व अन्य गावातील नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. त्यामुळे आई राधा ननवरे यांनी फिर्यात दिली आहे. सुजाता हिचे वर्णन : उंची पाच फूट, निमगोरा रंग, अंगाने सडपातळ, अंगात चॉकलेटी रंगाचा टॉप, ओढणी काळ्या रंगाची लेगीन घातलेली आहे.

कोरोनाचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याचे एेकूनच आला हार्ट अॅटॅक

मेंगडेवाडी येथील सिद्धी भरत मेंगडे ही मंगळवारी (ता. 30 जून) रात्री राहत्या घरातून निघून गेली. याबाबत तिची आई वैशाली मेंगडे यांनी फिर्याद दिली आहे. सिद्धी हिचे वर्णन : पाच फूट उंची, रंग गोरा, अंगाने सडपातळ, लाल रंगाची पॅन्ट, काळ्या रंगाचे टी शर्ट, मराठी भाषा बोलते. 

या तीन तरुणी कोणाला आढळून आल्यास मंचर पोलिस ठाण्याशी (दूरध्वनी क्रमांक 02133- 223159  संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस नाईक एच. सी. गिलबिले यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three young women from Ambegaon taluka have been missing for four days