esakal | मेट्रो धावणार शिवाजीनगर ते लोणी काळभोरपर्यंत
sakal

बोलून बातमी शोधा

Metro

शिवाजीनगर न्यायालय ते लोणी काळभोर दरम्यानच्या २१ किलोमीटर लांबीचा मेट्रो प्रकल्पाचा प्रारूप अहवाल दिल्ली मेट्रोकडून नुकताच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) सादर करण्यात आला आहे.

मेट्रो धावणार शिवाजीनगर ते लोणी काळभोरपर्यंत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - शिवाजीनगर न्यायालय ते लोणी काळभोर दरम्यानच्या २१ किलोमीटर लांबीचा मेट्रो प्रकल्पाचा प्रारूप अहवाल दिल्ली मेट्रोकडून नुकताच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) सादर करण्यात आला आहे. हा संपूर्ण मार्ग एलेव्हेटेड असून त्यासाठी अंदाजे सात हजार २०० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. एकूण २१ स्टेशने मार्गावर असणार आहेत.

पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. दरम्यान, शिवाजीनगरपासून ही मेट्रो हडपसर येथे नेण्याची मागणी होत होती. त्यामुळे हिंजवडी -शिवाजीनगर-हडपसर-फुरसुंगीपर्यंत असा मेट्रो मार्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु मध्यंतरी पालकमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर ते फुरसुंगी येथील सुलभ गार्डनपर्यंत दर्शविण्यात आलेला मेट्रो मार्ग लोणीकाळभोरपर्यंत वाढविण्यात यावा. दिल्ली मेट्रोने फुरसुंगीपर्यंतच्या सादर केलेल्या अहवाल सुधारित करून तो तातडीने सादर करावा, अशा सूचना पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परंतु कोविड-१९ चा संसर्ग रोखण्यासाठी २३ मार्चपासून देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आला. राज्य सरकारने जूनपासून लॉकडाउन शिथिल करण्यात सुरुवात केली. त्यानंतर दोन ते तीन महिने शहरातील व्यवहार व वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरळीत होण्यासाठीचा कालावधी लागला. या नवीन मार्गाचे सर्व्हेक्षणात ट्रॉफिक सर्व्हे हाच महत्त्वाचा भाग होता. परंतु मार्गावर फारशी वाहतूक नसल्यामुळे हे काम थांबले आहे. परंतु जानेवारीपासून वाहतूक सुरळीत झाल्यामुळे सर्व्हेक्षणाच्या कामाला दिल्ली मेट्रोकडून सुरुवात करण्यात आली होती. 

कोरोना फोफावतोय, स्वॅब दिलेल्यांना घरी सोडू नका; नागरिकांकडून मागणी

नुकतेच या सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण करून दिल्ली मेट्रोने पीएमआरडीएला प्रारूप अहवाल सादर केला आहे. सुमारे २१ किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून तो एलेव्हेटेड असणार आहे. नुकतीच दिल्ली मेट्रो आणि पीएमआरडीए अधिकार यांची एकत्रित बैठक झाली. येत्या महिन्याभरात दिल्ली मेट्रोकडून अंतिम अहवाल पीएमआरडीएला सादर करण्यात येईल. पीएमआरडीएने मान्यता दिल्यानंतर तो राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याची 
माहिती पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

पुलगेट-स्वारगेट मार्ग प्रस्तावित
महामेट्रोकडून पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट दरम्यान मेट्रो मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. या मार्गाला देखील पीएमआरडीएचा मेट्रो मार्ग जोडण्यात येणार आहे. त्यासाठी पुलगेट येथून स्वारगेट हा मार्ग दिल्ली मेट्रोने अहवालात प्रस्तावित केला आहे. या अहवालात या मार्गाचा देखील खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. 

पुणेकरांनो कोरोनाकाळात घ्या पुरेशी झोप; तज्ज्ञांनी सांगितले उपाय

सासवडपर्यंतच्या मार्गात अडथळे 
गाडीतळ येथून सासवड येथील आयटी पार्कपर्यंत हा मार्गाचा विस्तार करण्याचा मध्यंतरी विचार करण्यात आला होता. परंतु दिल्ली मेट्रोने केलेल्या पाहणीत हा मार्ग आर्थिक आणि प्रवासी संख्येच्या दृष्टीने  
सोईस्कर होऊ शकत नाही, असे आढळून आले आहे. त्यामुळे या मार्गावर मेट्रोची शक्यता सध्या तरी दिसत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

loading image