MIDC Exam : एकमेव परीक्षा नीट पार पडली, हीचा तरी निकाल लावा

सरळसेवा भरतीतील सर्वच परीक्षा वादग्रस्त ठरल्या आहे. आरोग्यसेवेपासून ते पोलिस भरती पर्यंत सर्वांचीच विश्वासार्हता धोक्यात आली आहे.
exam
examsakal

पुणे - सरळसेवा भरतीतील सर्वच परीक्षा वादग्रस्त ठरल्या आहे. आरोग्यसेवेपासून ते पोलिस भरती पर्यंत सर्वांचीच विश्वासार्हता धोक्यात आली आहे. अशा वेळी ऑनलाइन पद्धतीने आणि कोणताही वाद न होता पार पडलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) भरती परीक्षेचा निकाल का लांबतो. महामंडळाला संपर्क केले असता ते टोलवाटोलवीची उत्तरे देतात. निदान या परीक्षेचा निकाल तरी वेळेत जाहीर करावा, म्हणजे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, अशी आर्जव एमआयडीसीच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांनी सकाळकडे व्यक्त केली आहे. त्यातील निवडक प्रतिक्रिया...

एमआयडीसीच्या परीक्षेला तीन महिने होऊन गेले, अजूनही त्याचा निकाल लागला नाही. हेल्पलाइन ला फोन केल्यास कोणीच व्यवस्थित सांगत नाहीत आणि आज निकाल लागेल उद्या लागेल अशीच उत्तरे देत आहेत. एक तर परीक्षा उशिरा होऊन निकाल ही लवकर लावत नसल्यामुळे उमेदवार हवालदिल झाले आहेत.

- सुनिल घुले

अनेकवेळा पाठपुरावा करून सुद्धा निकाल घोषित होत नाही. याबाबत महामंडळाकडे विचारले असता ते सामान्य प्रशासन विभागाची परवानगी मिळाली नाही असे सांगतात. आणि सामान्य प्रशासन विभागात विचारणा केली तर आमच्याकडे काही प्रस्ताव नाही महामंडळाला विचारा असे सांगतात. विद्यार्थ्यांनी करायचं तरी काय आणि न्याय मागावा तरी कोणाकडे हा प्रश्न आहेच.

- धनराज पाटील ,नांदेड

एमआयडीसीत मी टंकलेखक पदासाठी अर्ज भरला होता. उत्तर तालीकेतील ५० पैकी ३६ प्रश्नांची उत्तरे बरोबर येत आहे. मात्र अजूनही परीक्षेचा निकाल लागलेला नाही. आघाडी सरकारच्या काळात त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे जो विलंब होत आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

- अरुण शिंगाडे, ता. सोनपेठ (परभणी)

exam
हेरिटेज वॉकने बारामतीकराना मिळाली नवीन माहिती

२०१९ मध्ये भरलेल्या अर्जाची परीक्षा २०२१ मध्ये झाली. तरी सरकारला याचे गांभीर्य नाही. संपर्क क्रमांकावर फोन केला तरी समाधानकारक उत्तर मिळत नाही.

- आकाश गुल्लापल्ली

एमआयडीसीच्या परीक्षेत चांगले गुण पडले आहे. माझ्यासोबतच अनेक विद्यार्थ्यांचे वय निघून चाललीय. मात्र आमच्याकडे ना एमआयडीसीचे अधिकारी लक्ष देतात ना मंत्री.

- चेतन, नागपूर

वाहक आणि मदतनीस पदासाठी अर्ज केला होता. आता माझे वय ४० झाले आहे. केव्हा भरती होणार.

- गोपाल तराळे, जिल्हा अकोला

राज्य सरकारने खासगी कंपनीला दिलेल्या कंत्राटामुळे हे घोळ होता. आम्हाला तर सरळसेवा भरतीत भ्रष्टाचारच जास्त होत असल्याचे दिसत आहे. मंग अभ्यास करून काय फायदा. या सर्व परीक्षा पारदर्शकपणे पार पडावी.

- महेंद्र सुरेश पाटील, नाशिक

सरकारी जागांची संख्या जेमतेम आहे. भरती लवकर निघत नाही. आणि निघाली तर अशा वादग्रस्त गोष्टी होत आहे. निवडणूक प्रक्रियेप्रमाणे आमच्या परीक्षाही पारदर्शक आणि जलदगतीने व्हाव्यात.

- बी. जी. नागरगोजे, नाशिक

एमआयडीसीने किमान एक निवेदन तरी या भरतीबद्दल द्यायला हवे. नेमकी भरती का थांबली? किती दिवसात निकाल लागणार आहे? अधिकृत माहिती एमआयडीसीपासून सामान्य प्रशासन विभागापर्यंत कुणीही द्यायला तयार नाही. उमेदवार निकालाकडे डोळे लावून बसलेत. सरकारमध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विधा्यार्थ्यांना उत्तर दायी कुणीही नाही.

- तुळशीराम माकणे, निलंगा जि. लातूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com