

Milk Procurement Price Increased
कात्रज - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच चारा, वैरण आणि वाहतूक खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. संघाने गाय व म्हैस दूधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाने वाढ केली असून, ही दरवाढ ११ सप्टेंबर २०२६ पासून लागू होणार आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांसाठीच्या दूध विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.