Pune : लाळ खुरकूत आजारामुळे गायी-म्हैशी दुधाला कमी पडल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

buffalo

लाळ खुरकूत आजारामुळे गायी-म्हैशी दुधाला कमी पडल्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उंड्री - ढगाळ वातावरणामुळे गायी-म्हैशीला लाळ खुरकूत आणि लम्पी आजार होतो. दोन्ही आजार संसर्गजन्य आहेत. जनावरांना जास्त ताप येतो, पायाला जखमा होतात. खाता येत नाही, तोंडाची कातडी जाते. त्यामुळे जनावरांचे खाणे कमी होते आणि दुधाला कमी पडतात त्यामुळे लसीकरणावर जास्तीचा भर दिला पाहिजे, असे फुरसुंगी-शेवाळेवाडी येथील पशुधन पर्यवेक्षक अशोक सावंत यांनी सांगितले.

सावंत म्हणाले की, लाळ खुरकूत आजारामुळे गायी-म्हैशीचे गाभ राहण्याचे प्रमाण कमी होते. जनावरे निकामी होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. लम्पी रोगामुळे जनावरांच्या अंगावर गाठी येतात आणि त्या फुटून जखमा होतात. या आजारावर आठवडा ते पंधरा दिवस उपचार करावे लागतात. जनावर गायी-म्हैश गाभण असेल तर अर्बोशन होते. गायी आणि बैलांमध्ये लंपी आजार आढळून येतो, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: बारामतीच्या आयुर्वेदीक महाविदयालय व रुग्णालयासाठी 394 पदांची निर्मीती

उंड्री, पिसोळी, वडाचीवाडी, औताडेवाडी, होळकरवाडी, हांडेवाडी, वडकी (ता. हवेली) आदी परिसरातील जनावरे ढगाळ वातावरणामुळे आजारी पडत असून, दुधाला कमी पडत आहेत, त्यामुळे हवालदिल झाला आहे, असे उंड्रीतील दूध उत्पादक शेतकरी शेखर भिंताडे यांनी सांगितले.

शेतकरी जालिंदर तुळशीराम कामठे म्हणाले की, मागिल चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. एवढेच नव्हे तर डिसेंबर संपत आला तरी थंडी अजुनही वाढलेली नाही. त्यामुळे ज्वारी पिकावर चिकटा, कांद्याच्या पातीवर पांढरे डाग, वालवर आणि पावटा पिकावर मावा, गव्हाला अळीचाही प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. नवीन कांद्याला देखील करप्याने वेढले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top