esakal | अखेर 'आयसर'चा बेपत्ता विद्यार्थी सापडला 
sakal

बोलून बातमी शोधा

Missing student of IISER was eventually found

विकास हिमांशू (वय 23, रा.मुलांचे वसतिगृह, आयसर कॅम्पस, पाषाण) असे संबंधीत विद्यार्थ्याचे नाव आहे. विकास हा 19 फेब्रुवारीला आयसर संस्थेच्या परिसरातुन बेपत्ता झाला होता. याप्रकरणी संस्थेने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात विद्यार्थी हरवल्याबाबत अर्ज दिला होता. त्याचबरोबर आयसर संस्था, विद्यार्थ्याचे मित्र, पालकांकडून त्याचा शोध घेतला जात होता. विशेषतः आयसर या संस्थेने आपल्या अधिकृत ट्‌विटर खात्यावर विद्यार्थ्याची माहिती देऊन त्याच्याबाबत नागरीकांना माहिती देण्याचे आवाहन केले होते.

अखेर 'आयसर'चा बेपत्ता विद्यार्थी सापडला 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : पाषाण येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेच्या (आयसर) आवारातून बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचा शोध घेण्यात पोलिसांना अखेर यश आले. संबंधीत विद्यार्थी हा त्याच्या मुळगावी सुखरुप आहे. पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने त्याचा शोध घेतला. 

दारु पिताना हाकलून लावले म्हणून टोळक्‍याने दोघांना.....

विकास हिमांशू (वय 23, रा.मुलांचे वसतिगृह, आयसर कॅम्पस, पाषाण) असे संबंधीत विद्यार्थ्याचे नाव आहे. विकास हा 19 फेब्रुवारीला आयसर संस्थेच्या परिसरातून बेपत्ता झाला होता. याप्रकरणी संस्थेने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात विद्यार्थी हरवल्याबाबत अर्ज दिला होता. त्याचबरोबर आयसर संस्था, विद्यार्थ्याचे मित्र, पालकांकडून त्याचा शोध घेतला जात होता. विशेषतः आयसर या संस्थेने आपल्या अधिकृत ट्‌विटर खात्यावर विद्यार्थ्याची माहिती देऊन त्याच्याबाबत नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, विद्यार्थी बेपत्ता होण्याचे प्रकरण गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या 'मनुष्य मिसींग सेल'ने गांभीर्याने घेऊन त्याचा शोध सुरू केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे त्याचा शोध घेताना तो औंध येथील ब्रेमेन चौकातील शिवनेरी बस थांब्यावरून मुंबईला गेला असल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित शिवनेरी बसचालकाकडे विचारणा केली. त्यावेळी तो दादरला उतरल्याचे पोलिसांना समजले. त्याच्या गावाकडे संपर्क साधल्यानंतर तो गावाशेजारील रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी असल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी त्याच्या पालकाशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी त्यांचा मुलगा सुखरुप आल्याचे सांगितले.

आश्चर्य ! 'या' प्राण्याला ऑक्सिजनची गरजच नाही !

दरम्यान, आई-वडील रागवल्याने घरुन निघून आलेल्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीस पोलिसांनी तिच्या पालकांच्या ताब्यात दिले 

loading image