esakal | ''मला साधा मेसेज करता येत नाही, मी ट्विट कसे करणार?''

बोलून बातमी शोधा

Bhimrao-Tapkir
''मला साधा मेसेज करता येत नाही, मी ट्विट कसे करणार?''
sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी: मला साधा मेसेज करता येत नाही तर मी ट्विट कसे करणार, असे म्हणत खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी बहुली (ता. हवेली) येथील भगतवाडीतील जळीत ग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या प्रत्येकी पन्नास हजारांच्या मदतीवरून 'यू-टर्न' केला आहे. एका वर्तमानपत्रातील बातमीसह मदत जाहीर केल्या बाबतचे ट्विटही आमदार भीमराव तापकीर यांच्या ट्विटर अकाऊंटवरून डिलीट करण्यात आले आहे.

दिनांक 14 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत बहुली गावातील भगतवाडी येथील 16 घरे भस्मसात झाली. आगीचे स्वरूप एवढे भीषण होते की, सर्व घरांसह अन्नधान्य, कपडे, रोख रक्कम, दाग-दागिने, भांडी व इतर साहित्याची अक्षरशः राख झाली. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्याच दिवशी दुपारच्या सुमारास आमदार भीमराव तापकीर यांनी बहुली येथे जाऊन जळालेल्या घरांची पाहणी केली. यावेळी काही पदाधिकारीही आमदार तापकीर यांच्याबरोबर होते. दुसऱ्या दिवशी एका वर्तमानपत्रात आमदार तापकीर यांनी जळीतग्रस्त कुटुंबांसाठी प्रत्येकी 50 हजार रुपये मदत जाहीर केल्याची बातमी प्रसारित झाली. तसे ट्विटही आमदार तापकीर यांच्या ट्विटर अकाउंटवरून 15 मार्च रोजी करण्यात आले होते. याबाबत बहुली येथील जळीतग्रस्त कुटुंबांतील काही व्यक्तींशी संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकारची रोख मदत अद्याप पर्यंत मिळालेली नसल्याचे सांगितले.आमदार भिमराव तापकीर यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता मी रोख स्वरूपात मदत देण्याबाबत कोठेही बोललो नव्हतो, अशी माहिती त्यांनी दिली आहे.कंचनजंगा'वर खरंच लोक गायब होतात?

हेही वाचा: ‘थ्री टी प्लॅन’मुळे कोरोनावर सहज मात

img

हेही वाचा: मालदीवमध्ये भारतीयांना नो एन्ट्री; कोरोनामुळे घेतला निर्णय

काय होते आमदार तापकीर यांचे ट्विट.........

"माझ्या खडकवासला विधानसभा मतदार संघातील बहुली येथील भगतवाडी येथे दुर्दैवी घटनेत पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत 14 घरांचे नुकसान झाले. काल रविवारी दि. 14 मार्च 2021 रोजी प्रत्यक्ष दुर्घटना स्थळी जाऊन पाहणी केली होती. तसेच माझ्याकडून प्रत्येकी 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे."

"मी रोख स्वरूपात मदत देण्याबाबत कोठेही बोललो नव्हतो.मला साधा मेसेज करता येत नाही तर मी ट्विट कसे करणार? मी रोख मदतीऐवजी घरांच्या बांधकामासाठी खडी, क्रशसॅंड \च्या काही गाड्या देणार आहे."

- भिमराव तापकीर, आमदार, खडकवासला विधानसभा मतदारसंघ.

हेही वाचा: कंचनजंगा'वर खरंच लोक गायब होतात?