होळकरांची वास्तू रयतकडून ताब्यात घ्यावी; आमदार पडळकरांची मागणी

Holkar
Holkar
Updated on

पुणे : मल्हारराव होळकरांनी बांधलेली आणि सध्या रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात असलेली वाफगाव (ता. खेड) येथील वास्तूची दुरावस्था झाली आहे. तिच्या संवर्धनासाठी ती सरकारने रयत शिक्षण संस्थेकडून ताब्यात घ्यावी आणि होळकर कुटुंबीयांकडे देत तिचे जतन करावे, अशी मागणी विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. 

सवाई यशवंतराव होळकर (प्रथम) यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त बुधवारी आयोजित कार्यक्रमात पडळकर बोलत होते. यावेळी भूषणराजे होळकर यांचे हस्ते राज्याभिषेक करण्यात आला, तसेच अभिषेक, गडपूजन, ध्वजारोहण, भंडारा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. होळकर यांनीही वास्तूच्या जतनासाठी सरकारने पाऊले उचलावी, अशी मागणी केली आहे.

वास्तूतील शिक्षण संस्थेला आमचा विरोध नसून, तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. सरकारचे धोरण किल्ले संवर्धन करण्याचे आहे. होळकरांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला आहे. या वास्तूला स्मारकाचा दर्जा देत 50 कोटीचा निधी द्यावा, असे पडळकर म्हणाले. यावेळी नवनियुक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कारही भूषणराजे यांच्या हस्ते करण्यात आला होता. 

सुभेदार मल्हारराव होळकर यांनी हा किल्ला उभारला. स्वातंत्र्याच्या वेळी शैक्षणिक उपयोगासाठी होळकर यांनी हा किल्ला रयत शिक्षण संस्थेला दिला. इतर गडकिल्ल्यांप्रमाणे या वास्तूचेही जतन करणे आवश्‍यक असून रायगडाच्या धर्तीवर येथेही समिती स्थापन व्हावी. 
- भूषणराजे होळकर, होळकरांचे वंशज 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Vijaykumar Magar, Deputy Inspector General of the State Reserve Police Force (Pune Range), who has been awarded the President’s Police Medal for distinguished service.
Health officials and Ruby Hall Clinic representatives discuss expanding cardiac and cancer treatment under government health schemes in Maharashtra.
Around 400 youth participated in awareness rallies across 10 Lighthouse skill development centres in Pimpri-Chinchwad on Independence Day.
Tourists flocked to Naneghat in Junnar on August 15 to enjoy the Independence Day holiday and the monsoon season.
Marathi News Esakal
www.esakal.com