आमदार कुल यांनी केले पत्नीसमवेत मतदान

आमदार कुल यांनी केले पत्नीसमवेत मतदान

राहू : राहू (ता. दौंड) येथील कैलास विद्या मंदिरात दौंडचे आमदार राहुल कुल, भाजपच्या जिल्हा महिला अध्यक्षा कांचन कुल यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी सकाळी मतदारांचा उत्साह जाणवत होता. दुपारनंतर मात्र मतदान केंद्रावर शुकशुकाट होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, मतदान मोजकेच असल्यामुळे संबंधित पक्षाचे कार्यकर्ते एका मतदानासाठी वारंवार संपर्क करत करत असल्याने चांगलाच कस लागला. अनेक मतदारांनी पदवीसाठी नाव नोंदणी केली होती. मात्र त्यांचा मतदार यादीत नाव न आल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. पदवी मतदार आणि शिक्षक मतदार संघासाठी दौंड तालुक्यामध्ये दौंड शहर, रावणगाव, यवत, केडगाव, राहू अशी ५ मतदान केंद्रे होती.

राहू मतदान केंद्रावर पदवी मतदार संघासाठी एकूण ४२३ मतदार आहेत. त्यापैकी २९४  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर शिक्षक मतदारसंघासाठी १०४ मतदार आहेत. त्यापैकी ८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पदवीधर मतदार संघासाठी ७०.८३ टक्के तर शिक्षक मतदारसंघासाठी ८५.५० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. एस. धांडोरे, अर्जुन स्वामी, गोरख थोरात, नवनाथ सोनवणे यांनी दिली.

जरी मतदान मोजकेच असले तरी मतदान केंद्रावर सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले. मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. म्हणून यवत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. मतदान केंद्रावर दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, जिल्हामहिला अध्यक्ष वैशाली नागवडे, भाजपचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, गणेश आखाडे आदींनी भेटी देऊन माहिती घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com