
पिंपरी : शहरातील कोरोना बाधित रुग्णांना आयसीयू व व्हेंटीलेटर पुरविण्यात यावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी महापालिका मुख्यालयाच्या आवारात आंदोलन केले. नगरसेवक सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच, रोजचा मृतांचा आकडाही 25 च्या जवळपास पोचला आहे. दीडशे पेक्षा अधिक रुग्ण गंभीर आहेत. शहरातील महापालिकेचे व खाजगी जवळपास सर्वच रुग्णालयांमध्ये रुग्ण आहेत. नवीन रुग्णांना रुग्णालयांमध्ये जागा मिळत नाही, अशी स्थिती आहे. यामुळे सर्वसामान्य रुग्णांची अधिक अडचण होत आहे. खाजगी रुग्णालयांचा खर्च त्यांना परवडत नाही, असे निवेदन मनसेने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहे.
रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या गरजू रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटीलेटरसुद्धा वेळेवर मिळत नाही. यामुले रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसते. आतापर्यंत शहरात 685 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या सोयीसाठी ऑटो क्लस्टर व बालनगरी येथे कोविड केअर सेंटर उभारले जात आहे. त्यांचे काम लवकर करण्यात यावे, असेही निवेदनात म्हटले आहे. त्यावर मनसेचे राजू सावळे, विशाल मानकरी, बाळा दानवले, मयूर चिंचवडे, दत्ता देवतरासे, सुशांत साळवी, रवी जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
(Edited by : Sagar Diliprao Shelar)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.