आदित्य यांच्यापाठोपाठ 'राजपुत्र' अमित ठाकरेही पक्ष बांधणीसाठी मैदानात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amit thackeray

आदित्य यांच्यापाठोपाठ 'राजपुत्र' अमित ठाकरेही पक्ष बांधणीसाठी मैदानात

मुंबई - शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि चिरंजीव आदित्य ठाकरे मैदानात उतरले असून पक्ष उभारणीसाठी सुरुवात केली आहे. शिवसेनेची स्थिती सध्या बिकट असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील त्याच स्थितीत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे देखील पक्षबांधणीसाठी मैदानात उतणार आहेत. (Amit Thackeray news in Marathi)

अमित ठाकरे तीन दिवस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. कोकण, उत्तर महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर येणार आहेत. ते १२,१३ आणि१४ ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

या दौऱ्यात ते महाविद्यालय तरुणांशी संवाद साधत विद्यार्थी संघटनेला बळ देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच अमित ठाकरे सगळ्या मतदार संघांमध्ये जाऊन पक्ष बांधणीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.

अमित ठाकेर पुण्यातील ८ आणि शिरूर लोकसभा मंतदार सघातली मधील ५ विधानसभा मतदार संघात जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. १२ ऑगस्टला अमित ठाकरे कोथरूड, खडकवासला, भोर, वेल्हा, मुळशी, शिवाजीनगर, वडगाव शेरी, कसबा, कॅन्टोन्मेंट या ठिकाणी दौरा करणार आहेत. तर १३ तारखेला पर्वती, हडपसर, पुरंदर, पिंपरी चिंचवड, मावळ या मतदारसंघात आणि १४ तारखेला शिरूर, चाकण आणि खेड मध्ये दौरा करणार आहेत.