कोथरूडमध्ये मनसेने मतमोजणी थांबवली | Election Results 2019

MNS ask to stop counting in Kothrud constituency for Vidhansabha elections
MNS ask to stop counting in Kothrud constituency for Vidhansabha elections

पुणे : कोथरुडमधील यादी नं. 127, राजा शिवराय प्रतिष्ठाण येथील एका ईव्हिएम मशिनचा नंबर वेगळा असल्याची हरकत मनसेने घेतली आहे. त्यामुळे या एका टेबलवरील मतमोजणी थांबवली आहे. 

कोथरूडमधून भाजपचे चंद्रकांत पाटील तर मनसेचे अॅड. किशोर शिंदे अशी लढाई होती. सर्व राज्याच्या नजरा या लढतीवर लागल्या आहेत. अशातचे मनसेचे ईव्हीएमवर हरकत घेतल्याने पुन्हा एकदा कोथरूडवर चर्चा होताना दिसतीय. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील शेवटच्या क्षणी कोथरूड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. सर्व प्रमुख विरोधी पक्षांनीही या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे, भाजपचा बालेकिल्ला मानला जात असलेल्या या मतदारसंघातील लढतीकडे राज्याचे लक्ष आहे. 

चंद्रकांत पाटील हे पुण्याबाहेरील उमेदवार असल्याची टीका झाली. या भागातून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले शिंदे स्थानिक उमेदवार असल्याचा प्रचार विरोधी पक्षांनी केला. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी कोथरूड गावात सभा घेऊन प्रचारात रंग भरला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा पुण्यात झाली. मोदी यांची सभा मुख्यत्वे पाटील यांच्यासाठी झाली. पाटील यांच्या प्रचारासाठी पक्षाची केंद्राची व राज्याची यंत्रणाही कामाला लागली होती. शहरातील भाजपची सर्व यंत्रणा या भागात दिवसरात्र प्रचारात होती. पाटील यांच्यासाठी खासदार गिरीश बापट यांनी मतदारसंघात तळ ठोकला होता. तरीदेखील सर्व विरोधी पक्षांनी एकच उमेदवार दिल्याने, तसेच शहरातील प्रचारातही पाटील यांना लक्ष्य केल्याने, प्रचाराच्या ऐन धामधुमीच्या काळात पाटील यांना अनेक दिवस या मतदारसंघात अडकून पडावे लागले. 

कोथरूड मतदारसंघ हा पूर्वी शिवाजीनगर मतदारसंघाचा भाग होता. पूर्वीचा शिवाजीनगर व 2009 नंतर झालेला कोथरूड मतदारसंघात 1980 पासून भाजप-शिवसेना युतीचेच उमेदवार निवडून येत आहेत. यापूर्वी खासदार अण्णा जोशी, शिवसेनेचे माजी मंत्री शशिकांत सुतार, शिवसेनेचे विनायक निम्हण, चंद्रकांत मोकाटे यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. भाजपच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांच्याऐवजी चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com