'पाकिस्तान जिंदाबाद'ला मनसे देणार 'हर हर महादेव'ने प्रत्युत्तर; पुण्यात उद्या निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

'पाकिस्तान जिंदाबाद'ला मनसे देणार 'हर हर महादेव'ने प्रत्युत्तर; पुण्यात उद्या निदर्शने

पुणे - पुण्यात "पाकिस्तान जिंदाबाद" या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे संकेत दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली होती. आता पुणे शहर मनसे आक्रमक झाली असून उद्या पाकिस्तान जिंदाबादला प्रत्युत्तर देण्यात येणार आहे.

हेही वाचा: Raj Thackeray : ...तर, उगाचंच सणासुदीत खळ्ळखट्याक होईल; राज ठाकरेंचं ट्वीट

पुण्यात मनसे हर हर महादेव म्हणत पुण्यात निदर्शने करणार आहे. मनसे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे. पुणे शहर इस्लामिक दहशवाद्यांकडून गढ बनवला गेल्याचं चित्र काल-परवाच्या घटनेने निर्माण झाले आहे, असा मनसेने दावा केला आहे.

इथे जर इस्लामिक मूलतत्ववादी "पाकिस्तान जिंदाबाद " च्या घोषणा देत असतील राजसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार देश रक्षणार्थ "हर हर महादेव" च्या घोषणा देऊन निदर्शन करणार असल्याचं मनसेकडून जाहीर करण्यात आलं आहे.

हेही वाचा: दसरा मेळाव्यात शिंदे पुत्राला मिळणार मोठी जबाबदारी? आदित्य ठाकरेंना थेट आव्हान

राष्ट्रीय तपास एजन्सीनं (NIA) पुण्यासह देशभरात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवरील छापेमारीविरोधात काल पुण्यात आंदोलन केलं. यावेळी 'पाकिस्तान जिंदाबाद' आणि 'अल्लाह हूं अकबर' अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ट्वीट करत थेट इशारा दिला आहे.

राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या पदाधिकान्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, 'पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर' अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे.