MNS Supports NCP Candidate Ashwini Kadam in Parvati VidhanSabha Election
MNS Supports NCP Candidate Ashwini Kadam in Parvati VidhanSabha Election

Vidhan Sabha 2019 : मनसेचा आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांना पाठींबा

Published on

सहकारनगर (पुणे) : समाज घडवण्यासाठी शिक्षिका म्हणून काम करीत राजकारणापेक्षा समाज कार्याला महत्व देणाऱ्या पर्वती भागातील स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या पर्वती विधानसभेतील महाआघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांना मनसेने जाहीर पाठींबा दिला आहे. या पाठींबामध्ये मनसेचे अनिल शिदोरे व बाबू  वागस्कर यांनी मोलाची भूमिका बजावली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, निलेश ढमढेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष महेश शिंदे, नगरसेवक विशाल तांबे, राष्ट्रवादी पर्वती अध्यक्ष नितीन कदम, तसेच मनसेचे पर्वती उपविभाग प्रमुख जयराज लांडगे, विभाग प्रमुख राहूल गवळी, सतीश तावरे, सनी जगताप, विकी अमराळे, सनी खरात, संतोष चव्हाण, कुशल शिंदे, अभिजित टेंबेकर, विशाल शिंदे,महेश जाधव इ. मनसेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

घरांच्या हस्तांतरांचा प्रश्न तीन महिन्यात मार्गी लावणार : आश्विनी कदम 

यावेळी जयराज लांडगे म्हणाले, पर्वतीमध्ये मनसेने दिलेला पाठींब्यामुळे पर्वतीमध्ये अश्विनी कदम यांचा विजय निश्चित आहे. या विजयामध्ये मनसेचा सिंहाचा वाटा असणार आहे. तसेच, उच्च शिक्षित असणाऱ्या शिक्षिका अश्विनी कदम यांना जनतेचा सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे.

पर्वती कोणाची वहिनींची की ताईंची?

उमेदवार अश्विनी कदम यावेळी म्हणल्या की, मनसेचा मिळालेला जाहीर पाठिंब्याचा आम्हाला नक्कीच फायदा होणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मनापासून आभार मानते. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि सर्वधर्मीय बहुजन समाज घटकांनी दिलेला पाठींबा यामुळे पर्वतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार आहे. सत्तेत आल्यावर पर्वतीला जो बकालपणा आला आहे तो दूर करण्यासाठी आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com