मनसे नेते वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

त्यांना पोलिस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
वसंत मोरे आणि साईनाथ बाबर
वसंत मोरे आणि साईनाथ बाबर Sakal

पुणे : पुणे मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) आणि नेते वसंत मोरे (MNS Vasant More) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलिस स्टेशन येथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दोघांनाही पोलिस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

(Case File Against Vasant More And Sainath Babar)

मनसेच्या वतीने पुणे महानगरपालिकेत केलेलं आंदोलन भोवलं असून मनसेचे पुण्यातील शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि मनसे नेते नगरसेवक वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसंत मोरे आणि साईनाथ बाबर
मशिदीवरील उतरलेले भोंगे आता शाळेवर लागणार; योगींचे आदेश

दरम्यान मनसेच्या वतीने १७ मार्च रोजी पाण्याच्या प्रश्नावरून आंदोलन केलं होतं. पुणे महानगरपालिकेच्या आवारात कोणतेही आंदोलन करण्यास मनाई असताना त्यांनी आंदोलन केल्यामुळे तेथील सुरक्षारक्षकाने लेखी तक्रार दिली होती. त्याप्रमाणे वसंत मोरे, जिल्हाध्यक्ष साईनाथ बाबर आणि त्यांच्यासोबतच्या १०० ते १२५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सात कलमाअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

परवानगी नसताना वसंत मोरे आणि साईनाथ बाबर महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर गेले आणि त्यांनी तिथे आंदोलन सुरू केलं. त्यानंतर काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी सर्व मिळून १०० ते १२५ जणांनी महापालिकेच्या गेटवर येऊन आंदोलन करत सुरक्षारक्षकांना ढकलून दिले आणि महापालिकेच्या आवारात आत प्रवेश केला होता. त्यामुळे गेटची कडीही तुटल्याचं तक्रारीत सांगितलं आहे.

वसंत मोरे आणि साईनाथ बाबर
मुलींची निर्वस्त्र पूजा प्रकरण : भोंदूबाबाकडे सापडले शेकडो मुलींचे फोटो; लैंगिक अत्याचाराचा संशय

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवस पुण्यात होते. त्यांची सभा ऐनवेळी रद्द झाली असून ते गेल्यानंतर पाठीमागे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद लागला होता. त्यानंतर आता मनसे शहराध्यक्ष आणि साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांच्यासहित १०० ते १२५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com