मनसेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर शिरूरची आरोग्य यंत्रणा सरळ

भरत पचंगे
Thursday, 27 August 2020

शिरुर तालुक्यातील काही रुग्णालयांच्या बाबतीत मोठ्या तक्रारी सुरू आहेत. याबाबत प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करुनही काहीच कार्यवाही होत नसल्याने शिरुर तालुका मनसेचे उपाध्यक्ष तेजस यादव यांनी जिल्हाधिकारी व आरोग्य उपसंचालक यांच्याकडे लेखी तक्रार केली.

शिक्रापूर (पुणे) : कोरोना काळात आरोग्य खात्याचे अधिकारी आणि खासगी रुग्णालये मिळून कोरोना संशयित व कोरोना निष्पन्न रुग्णांचा मानसिक व आर्थिक छळ करीत आहेत. याच तक्रारीवरून आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी शिरूर तालुक्यातील सर्व खासगी रुग्णालयांचे चौकशी अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश नुकतेच दिल्याची माहिती शिरूर तालुका मनसे उपाध्यक्ष तेजस यादव यांनी दिली.  

टेमघर धरणाची पाणीगळती 96 टक्के रोखण्यात यश
       
कोरोनाकाळात रुग्ण व रुग्ण नातेवाईकांना त्रास होईल, असे वर्तन खासगी रुग्णालयांकडून होऊ नये, रुग्ण दाखल करताना आर्थिक निकषाच्या अटी रुग्णांवर टाकू नयेत, अशा स्पष्ट सुचना राज्य सरकारकडून सर्व खासगी व सरकारी रुग्णालयांना देण्यात आलेल्या आहेत. या सर्व आदेशाच्या पार्श्वभूमीवर शिरुर तालुक्यातील काही रुग्णालयांच्या बाबतीत मोठ्या तक्रारी सुरू आहेत. याबाबत प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करुनही काहीच कार्यवाही होत नसल्याने शिरुर तालुका मनसेचे उपाध्यक्ष तेजस यादव यांनी जिल्हाधिकारी व आरोग्य उपसंचालक यांच्याकडे लेखी तक्रार केली.

पुण्यात रुग्णालयाच्या दारात सोडला प्राण

याबाबत यादव यांच्याकडून १० जुलैपासून जिल्हाधिकारी व आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू होता. मात्र, कुठलीही थेट कारवाई होत नसल्याने यादव यांनी झोपून आंदोलन करू, असा इशारा दिला. त्यावर आरोग्य उपसंचालक डॉ. देशमुख यांनी शिरूर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना वरील प्रमाणे आदेश दिले आहेत. सदर आदेश तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच शिरुर ग्रामिण रुग्णालयाच्या अधिक्षकांनाही पाठविला. या प्रकरणी तालुक्यातील एकाही कोरोना रुग्ण व रुग्ण नातेवाईक यांच्यावर होणारा अन्याय यापुढे मनसे सहन करणार नसल्याचेही यादव यांनी सांगितले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शिरुर मनसेकडून तक्रार अर्ज आल्यानंतर आम्ही चौकशीच्या सुचना दिलेल्या असून, कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करताना अ‍ॅडव्हान्सची सक्ती करू नये, अशी सुचनाही सर्व हॉस्पिटलला दिल्या आहेत. याबाबत शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करु नये, असेही सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना कळविण्यात आलेले आहे.  
 - डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS warns Shirur's health system