पुणे : मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीस गुन्हे शाखेच्या पथकाकडून बेड्या

76 हजार रुपयांचे मोबाईल जप्त
mobile phone
mobile phonesakal

पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागात गर्दीचा फायदा घेऊन नागरीकांचे मोबाईल(Mobile phone) चोरणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने(Crime Branch squad unit 1) बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून 76 हजार रुपयांचे मोबाईल जप्त केले.

mobile phone
निर्बंध चांगल्या स्पिरीटने घ्यावेत; आरोग्यमंत्र्यांनी दिली कोरोनाची इत्यंभूत माहिती

मुकेश शिवलाल दिवाकर (वय 21, रा. खराडी, मुळ रा. उत्तरप्रदेश), दिपककुमार मोहन जयस्वाल (वय 23, रा. चंदननगर, मुळ रा.उत्तप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनीट एकचे पथक पोलिस अभिलेखावरील गुन्हेगारांची तपासणी करीत होते. त्यावेळी पथकातील एका कर्मचाऱ्यास गर्दीच्या ठिकाणी नागरीकांचे मोबाईल चोरी करणारी टोळी शहरात सक्रीय झाली आहे. या टोळीतील दोघेजण खराडी येथील चंदननगर बाजारपेठेत मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने तेथे सापळा लावून दिवाकर व जयस्वाल या दोघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 76 हजार रुपये किंमतीचे सॅमसंग कंपनीचे 2, रेडमी 2, ओपोचे 2 व एमआय कंपनीचे दोन असे एकूण आठ मोबाईत जप्त केले.

mobile phone
लसीकरण केंद्रासाठी वेळेची मर्यादा नाही : केंद्राकडून स्पष्टीकरण

संशयित आरोपींनी हे मोबाईल शहराच्या मध्यवर्ती भागासह खराडी, चंदननगर, वडगाव शेरी या भागातुन चोरले असल्याची माहिती पोलिसांना दिली. आरोपींचा एक साथीदार पोलिसांच्या हातातुन निसटला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. आरोपींविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात तीन, विश्रामबाग पोलिस ठाण्यात एक असे मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, पोलिस कर्मचारी अजय थोरात, इम्रान शेख, तुषार माळवदकर, महेश बामगुडे, मीना पिंजण यांच्या पथकाने हि कारवाई केली.(Pune Crime news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com