पुनर्विकासाचे मॉडेल हे स्वतःच्या विचारातून निर्माण करायला हवे : सुरेश प्रभू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

'फ्लेम युनिव्हर्सिटी' आयोजित 'विमर्श' या व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रात 'रीइमॅजिनिंग इंडिया : रिशेपिंग दी डिकेड' या विषयावर प्रभू बोलत होते.
"कोणत्याही गोष्टीचा पुनर्विचार करायचा असेल तर आपल्या मनात त्याविषयी कोणते चित्र आहे? संबंधित बाबीत काय बदल करायचे आहेत? त्याला किती वेळ लागू शकतो? या सर्व गोष्टींचा विचार व्हायला हवा. देशाला नवीन आकार द्यायचा असेल तर आपण इंडस्ट्री आधीच्या की नंतरच्या भारताचा विचार करणार हे देखील महत्वाचे आहे.

पुणे : "यशस्वी झालेल्या सेलिब्रिटींच्या अनुभवातून आपण शिकलो पाहिजे. पण यशस्वी होण्याचे कोणतेही एक मॉडेल परिपूर्ण नाही. त्यामुळे पुनर्विकासाचे मॉडेल हे स्वतःच्या विचारातून निर्माण करायला हवे. कोणाच्याही यशसुत्रीतून ते कॉपी-पेस्ट केलेले नसावे. तसेच आर्थिक विकास होत असताना त्यात समाजातील प्रत्येक घटकाचा विचार व्हावा. त्या प्रगतीत आपलाही हातभार आहे, अशी भावना सर्वांच्या मनात निर्माण व्हायला हवी," असे मत माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सोमवारी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

'फ्लेम युनिव्हर्सिटी' आयोजित 'विमर्श' या व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रात 'रीइमॅजिनिंग इंडिया : रिशेपिंग दी डिकेड' या विषयावर प्रभू बोलत होते.
"कोणत्याही गोष्टीचा पुनर्विचार करायचा असेल तर आपल्या मनात त्याविषयी कोणते चित्र आहे? संबंधित बाबीत काय बदल करायचे आहेत? त्याला किती वेळ लागू शकतो? या सर्व गोष्टींचा विचार व्हायला हवा. देशाला नवीन आकार द्यायचा असेल तर आपण इंडस्ट्री आधीच्या की नंतरच्या भारताचा विचार करणार हे देखील महत्वाचे आहे. स्वतःचे राज्य चालवण्यासाठी व नवीन समाज निर्माण करण्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य हवे होते. मात्र नवीन समाज कसा असेल यावर त्यावेळी देखील वैचारिक वाद होते. पण कोणत्याही बदलाचे व्हिजन स्पष्ट असेल तर बदल हा तात्काळ होतो. अन्यथा अनेक वर्ष उलटूनही हाती काहीच लागत नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या जगाकडे दुर्लक्ष करून आपण देशाला नवीन दिशा देण्याचा विचार नाही करू शकत नाही," असे प्रभू म्हणाले. 

'पुण्याची पीएमपी व्हेंटिलेटरवर; करार रद्द करण्यासाठी कंत्राटदारांना नोटिस

बदलाच्या विचारात तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकत प्रभू म्हणाले, "तंत्रज्ञान हे कायम असणार आहे. त्याच्या पद्धतीत मात्र बदल होत जातील. त्यामुळे तंत्रज्ञान हे भविष्यात सर्वाधिक परिणामकारक असणार आहे. मात्र हे सर्व होत असताना आपली संस्कृती आणि तत्व सांभाळून विकास करावा लागेल. यशाचे चित्र रंगवताना बऱ्याचदा यशस्वी सेलिब्रिटींचा विचार सेलिब्रिटींना फॉलो करतो. त्यामुळे आपले नवीन विचार प्रत्यक्षात येत नाही. त्यांचे अनुभव महत्त्वाचे आहे पण ते केवळ समजून घेण्यात समजून घ्या. नवीन घडवण्याची आपली क्षमता गमावून बसू नका," असा सल्ला यावेळी प्रभू यांनी विद्यार्थ्यांना दिला. एमबीए फायनान्सबॅच मधील विद्यार्थी आकाश लोढा यांनी या वेबिनारचे सूत्रसंचालन केले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिशान कामदार यांनी प्रास्ताविकात व्याख्यानमाले विषयी माहिती दिली. तर स्कूल ऑफ बिझनेसचे डीन डॉ. द्वारीका युनिआल यांनी आभार मानले. 

StartupStory: सोशल डिस्टन्सिंगसाठी तरुणानं डोकं लढवलं; तुम्हीही कराल कौतुक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The model of redevelopment should be created from one own thoughts said Suresh Prabhu