कोरोनाशी लढण्यासाठी 'आयुर्वेद' सज्ज; 'या' औषधांची चाचणी सुरूय...वाचा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

- भारतासह जगभरातील प्रयोगशाळेत वनस्पतिजन्य औषधांवर संशोधन 

पुणे : कोविड-19 ला रोखण्यासाठी जसे आधुनिक उपचार पद्धती आणि औषधांवर संशोधन झाले. तसेच वनस्पतिजन्य किंवा आयुर्वेदिक औषधांवरही संशोधन करण्यात आले. प्राचिनतम आयुर्वेदाची आधुनिक विश्‍लेषण पद्धतीने जगभरात चिकित्सा करण्यात आली. भारतासह जपान, थायलंड, अमेरिका आणि युरोपातील देशांमध्ये विविध प्रयोगशाळांनी हे संशोधन केले. यातील काही औषधांच्या आता कोविड-19साठी वैद्यकीय चाचण्याही घेण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वनस्पतीतील विषाणू 'अँटीबॉडी'चे वाहक  

विषाणूंची वाढ रोखणारे प्रतिपिंड (अँटीबॉडी) थेट पेशीत प्रवेश मिळवू शकत नाही. ते पेशिभित्तीकेवर असलेल्या प्रतिजैविकाशी (अँटिजन) अभिक्रिया करतात. कोरोनाला कारणीभूत 'सार्स कोविड-2' हा 'आरएनए'पासून बनलेला विषाणू पेशींच्या आतमध्ये असतो. त्यामुळे अँटीबॉडींना थेट हल्ला करता येत नाही. यावर उपाय म्हणून वनस्पतींमध्ये आढळणाऱ्या विषाणूंचा मानवी पेशीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी उपयोग करता येईल का? यावर बंगळूर येथील भारतीय विज्ञान संस्थेच्या (आयआयएससी) जीवरसायनशास्त्र विभागात संशोधन झाले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

वनस्पतींमध्ये आढळणारे 'पेपर वेन बेंन्डीग व्हायरस'चा (पीव्हीबीव्ही) अँटीबॉडी पेशीमध्ये पोचवण्यासाठी वाहक म्हणून वापर करता येईल, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. आर्काईव्ह ऑफ व्हायरॉलॉजी या शोधपत्रिकेत नुकताच हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही स्तनधारी प्राण्यांमध्ये वाहक म्हणून या वनस्पतिजन्य विषाणूचा वापर करता येईल. 

शास्त्रज्ञांनी का केली आयुर्वेदाची चाचपणी? 

- कोविड-19 हा श्वसनमार्गाशी निगडित विषाणूजन्य आजार आहे. 

- पाच हजार वर्षांपूर्वीच्या आयुर्वेदामध्ये विषाणूजन्य आजारांसाठी मोठे संशोधन. 

- पारंपारिक अजारांबरोबरच एड्‌स, सार्स कोविड, क्षय आदी आजारांसाठी वनस्पतिजन्य औषधांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. 

- आयुर्वेदामध्ये 3 हजार वनस्पतींचा श्वसनमार्गाशी निगडित आजारांवर संशोधन 

- नैसर्गिक पद्धतीने तयार होणारी आयुर्वेदिक औषधांचा दुष्परिणाम नाही 

- याच पार्श्‍वभूमीवर वनस्पतिजन्य किंवा आयुर्वेदिक औषधांचे गुणधर्म तपासण्यासाठी जगभरात संशोधन सुरू 

- भारतातही आयुष मंत्रालय, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आदी संशोधन संस्थांचा सहभाग 
(स्त्रोत ः मानवी जनुकशास्त्र आणि रेण्वीय जीवशास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र वेल्लीगीरी यांचा 'सायन्स ऑफ द टोटल एन्व्हार्मेंट'या शोधपत्रिकेतील शोधनिबंध) 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बहुचर्चित वनस्पतिजन्य औषधांवर संशोधन  

1) अश्वगंधा

- आयआयटी दिल्ली आणि जपानच्या शास्त्रज्ञांचे संशोधन 

- कोविड-19च्या पुनरुत्पादनाला कारणीभूत 'एमप्रो' प्रथिनावर अश्वगंधातील विथेनॉन आणि कॅफिक ऍसिड हल्ला करते 

- आयुष मंत्रालय आणि सीएसआयआरच्या वतीने देशात वैद्यकीय चाचण्या घेण्यात येत आहे 

2) लसणातील तेल 

- भारतातील सेंटर फॉर इनोव्हेशन अँन्ड ऍप्लाइड बायोप्रोसेसिंग आणि थायलंडमध्ये संशोधन 

- सार्स कोविड-2 विषाणूला मानवी पेशींमध्ये प्रवेश देणाऱ्या 'एसीई-2' या एन्झाईमला प्रतिबंधित करते 

- पुढील सहा महिन्यात अधिकचे संशोधन पूर्ण होणार 

- सहज उपलब्ध आणि कमी किमतीत उपलब्ध 

3) 'चहा'मधील तेल 

- पालमपूर येथील हिमालयन बायोरिसोर्स टेक्‍नॉलॉजीचे संशोधन 

- चहामध्ये आढळणारे पॉलिफिनॉल नावाचे रसायन प्रसार करणाऱ्या प्रथिनावर हल्ला करते 

- एचआयव्हीसाठी यावर संशोधन झाले आहे. 

4) तंबाखूच्या पानातील प्रथिने 

- अमेरिकेतील ऑक्‍सफर्ड विद्यापीठात संशोधन 

- तंबाखूच्या पानांपासून मिळविलेल्या प्रथिनांच्या वापरातून लस विकसित करण्यात आली आहे. 

- सार्स कोविड-2 विषाणूच्या काट्यांवर असलेल्या ग्लायकोप्रोटीनला प्रतिबंध करते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या आयुर्वेदिक औषधांची वैद्यकीय चाचणी चालू 

- अश्वगंधा 

- यष्टिमधु मुलेठी 

- गुडुची आणि पीपली (गिलॉय) 

- पॉली हर्बल फॉर्मुलेशन 

जैवविघटनशील आणि कोणताही दुष्परिणाम नसलेल्या वनस्पतीमधील विषाणूंचा वापर उत्तम वाहक म्हणून होऊ शकतो. बाधित पेशींवर थेट हल्ला करणाऱ्या मोनोक्‍लोनल अँटीबॉडी याच्या साहाय्याने प्राण्यांच्या पेशींमध्ये पोचविण्यास मदत होणार आहे. वनस्पतिजन्य किंवा आयुर्वेदिक औषधांसंबंधीचे हे महत्त्वपूर्ण संशोधन आहे. 

- प्रा. एच.एस.सावित्री, जीवरसायनशास्त्र विभाग, आयआयएससी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modern treatment of Ayurveda for corona marathi news