भागवत धर्माकडून भारतीयत्वाचे रक्षण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

भौतिक सुखापेक्षा माणुसकीला आपल्या देशात महत्त्व आहे. भागवत धर्माने तळागाळात अध्यात्म रुजवले आहे. भागवत धर्माने भारतीयांच्या भारतीयत्वाचे रक्षण केले, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

आळंदी - भौतिक सुखापेक्षा माणुसकीला आपल्या देशात महत्त्व आहे. भागवत धर्माने तळागाळात अध्यात्म रुजवले आहे. भागवत धर्माने भारतीयांच्या भारतीयत्वाचे रक्षण केले, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सदगुरू जोग महाराज यांच्या पुण्यतिथी शताब्दी महोत्सवानिमित्त आळंदीत सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भागवत बोलत होते. या वेळी शांतीब्रह्म मारोती महाराज कुरेकर, आमदार महेश लांडगे उपस्थित होते. 

भागवत म्हणाले, ‘‘वारकरी कीर्तनकारांची व्यवस्था अव्याहतपणे उभे करण्याचे काम, हेच जोग महाराजांचे अवतार कार्य आहे. आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेस प्रत्यक्ष ईश्‍वरीय कार्याच्या प्रेरणेची परंपरा लाभली आहे.’’

पुण्यातील गोल्ड जिमला ग्राहक मंचाचा दणका

परमार्थाने टीका करत जगा म्हणजे सुख आणि शाश्वती मिळेल. जीवनात अर्थ आल्यावर परिस्थिती कशीही असली तरी शांती आणि समाधान मिळेल. हे आपल्या देशाने ओळखणे आणि याच आधारावर जीवनाची रचना करणारे शाश्वत नियम शोधून काढले, त्याला आपण धर्म म्हणतो. पूजा ही धर्माचा सत्याकडे नेणारा रस्ता आहे आणि ते रस्ते अनेकांचे अनेक आहेत, असे भागवत म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mohan bhagwat talking