esakal | 'अटल रँकिंग'मध्ये पुण्यातील कॉलेजांचा दरारा कायम; 'सीओईपी' ठरलं नंबर वन!
sakal

बोलून बातमी शोधा

COEP_Pune

पुण्याच्या शिक्षणक्षेत्रातील नावाजलेल्या शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयाने (सीओईपी) शासकीय उच्च शिक्षण संस्था या मधील देशातील पाच टॉपच्या संस्थांमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.

'अटल रँकिंग'मध्ये पुण्यातील कॉलेजांचा दरारा कायम; 'सीओईपी' ठरलं नंबर वन!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : विद्यार्थ्यांना नाविण्यपूर्ण कल्पनांसाठी दिलेले प्रोत्साहन, स्टार्टअपसाठी केलेली मदत यातून विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या अटल रॅकिंग ऑफ इंस्टीस्टूशनस ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट (एआरआयआयए) याच्या नामांकनात पुण्यातील १० पेक्षा जास्त संस्था चमकल्या आहेत.

शिक्षण मंत्रालय आणि 'एआरआयआयए'तर्फे शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करण्यात आले होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते 'अटल मानांकन'ची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये पुण्याच्या शिक्षणक्षेत्रातील नावाजलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने (सीओईपी) शासकीय उच्च शिक्षण संस्था या मधील देशातील पाच टॉपच्या संस्थांमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.

पुणेकरांच्या विरोधापुढे महापालिका झुकली; 'ते' बहुचर्चित टेंडर केलं रद्द!​

बारामती येथील विद्याप्रतिष्ठान कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाने शासकीय आणि अनुदानीत महाविद्यालय या गटात देशात पहिल्या 6 ते 25 संस्थांमध्ये मानांकन मिळवले आहे. खासगी विद्यापीठ गटातून बॅंड ए गटामध्ये केवळ सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिर्व्हसिटीचा समावेश आहे. तर बॅंड बी मध्ये भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, एमआयटी आर्ट डिझाईन अँड टेक्‍नॉलॅजी युनिर्व्हसिटी, सिंबायोसिस स्कील डेव्हलपमेंट अँड ओपन युनिर्व्हसिटीचा समावेश आहे.

अरे वा! कोथरुडकरांनी घरीच साकारल्या शाडूच्या गणेश मूर्ती

खासगी संस्थांच्या गटात बॅंड ए मध्ये पहिल्या 6 ते 25 संस्थांमध्ये जेएसपीएम राजर्षी शाहू अभियांत्रीकी महाविद्यालय, विश्‍वकर्मा इंस्टीट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी यांना स्थान मिळाले आहे. तर बॅंड बी मध्ये 26 ते 50 संस्थांमध्ये एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनीयरींग, पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरींग, मॉडर्न अभियांत्रीकी महाविद्यालय, सिंहगड टेक्‍नीकल एज्युकेशन सोसायटीज कॉलेज ऑफ फार्मसी यासंस्थांना स्थान मिळाले आहे.

'जेएसपीएम'चे संस्थापक डॉ. तानाजी सावंत यांनी राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाला मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत, संचालक डॉ. रवी जोशी, अनिल भोसले, प्राचार्य डॉ. राकेशकुमार, डॉ. शैलजा पाटील व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कोरोना हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कारण ऐकून व्हाल हैराण​

''शासकीय उच्च संस्थांच्या गटात 'सीओईपी'ने देशात पहिला क्रमांक मिळवला याचे पूर्ण श्रेय विद्यार्थी आणि शिक्षकांचे आहे. गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांनी इनोव्हेशन आणि स्टार्टअपमध्ये चांगल्या प्रकार काम केले. तीन विद्यार्थ्यांच्या नवीन कल्पनांची दखल घेऊन त्यांना शासनातर्फे प्रोजेक्‍टसह दीड कोटी रुपये मिळाले होते. तसेच गेल्या वर्षभरता 'सीओईपी'ने स्टार्टअप व इनोव्हेशनसाठी विविध प्रकारचे 56 कार्यक्रम घेतले होते.''
- डॉ. भारतकुमार आहुजा, संचालक, सीओईपी.

''भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाने उपलब्ध निधी आणि साधनांमधून नाविन्यपूर्ण कल्पना आणि स्टार्टअप उपक्रमांना प्रोत्साहन दिले. उद्योजकता आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांना पुढे नेणारे 55 राष्ट्रीय पातळीवरील उपक्रम आयोजित केले. पेटंट मिळवली तसे त्यांचे प्रकाशनही केले. त्यामुळे भारती विद्यापीठाच्या अभियांत्रीकी महाविद्यालयाला हे यश मिळाले आहे.''
- डॉ आनंद भालेराव, प्राचार्य

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)