esakal | कोरोना हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कारण ऐकून व्हाल हैराण
sakal

बोलून बातमी शोधा

Pune_Crime

गाडेने रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घातला तसेच रुग्णालयाच्या इमारतीवर दगडफेक केली.

कोरोना हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कारण ऐकून व्हाल हैराण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : खराडीतील रायझिंग मेडीकेअर या कोरोना उपचार रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर वाहतूक करणारी गाडी अडवून गोंधळ घालणाऱ्यास पोलिसांनी अटक केली. 

गणेश ज्ञानेश्वर गाडे (वय ३७, रा.पंढरीनगर, खराडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी विनोद भारती (वय ४०, रा. मुंढवा) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणेकरांच्या विरोधापुढे महापालिका झुकली; 'ते' बहुचर्चित टेंडर केलं रद्द!​

खराडीतील रायझिंग मेडीकेअर हॉस्पिटलला महापालिकेने कोरोना उपचार रूग्णालय म्हणून मान्यता दिली आहे. या रूग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर गाडीतून उतरविण्यात येत असल्याने सिलिंडरच्या टाकीचा आवाज होतो. या आवाजामुळे त्रास होत असल्याचा आरोप करून गाडे मंगळवारी (ता.१७) दुपारी चार वाजता रुग्णालयाच्या आवारात आले. त्यांनी ऑक्सिजन सिलेंडर वाहतूक करणारे गाडीचालक अशोक खेडेकर, सुरक्षारक्षक स्वप्नील शर्मा यांना धमकावले आणि सिलेंडर उतरविण्यास मज्जाव केला.

खडकवासला प्रकल्पात 91 टक्के पाणी; उजनीतील साठा 54 टक्‍क्‍यांवर​

त्यानंतर गाडेने रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घातला तसेच रुग्णालयाच्या इमारतीवर दगडफेक केली. सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच रुग्णालयात गोंधळ घालून तोडफोड केल्याप्रकरणी गाडे याला अटक करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रकाश पासलकर तपास करत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top