पुणे : शहरातील दहा ठिकाणांहून सव्वातीनशे आंदोलक ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

एनआरसी आणि सीएए विरोधात पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागातून 315 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना पोलिस ठाण्यात घेऊन जात रात्री उशिरा सोडून देण्यात आले. बंद दरम्यान शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी ही कारवाई करण्यात आली.

पुणे : एनआरसी आणि सीएए विरोधात पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागातून 315 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना पोलिस ठाण्यात घेऊन जात रात्री उशिरा सोडून देण्यात आले. बंद दरम्यान शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी ही कारवाई करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील बंद शांततेत पार पडला असल्याची माहिती सहआयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिली. बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलक एकत्रितरीत्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार होते. त्यामुळे पोलिसांनी आंदोलक जमा होताच त्यांना ताब्यात घेण्यास सुरवात केली. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना जवळच्या पोलिस ठाण्यात घेऊन जाण्यात आले.

तावडेंचा दिल्लीत विनोद; प्रचारसभेतील 'गर्दी'वरून ट्रोल

जमावाकडून कोठेही अनुचित प्रकार घडू नये आणि शांततेत बंद पार पडावा यासाठी पोलिस आंदोलकांवर लक्ष ठेवून होते. लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोळीबार मैदान (105), चंदननगर (45), डेक्कन (65), वानवडी (48), कोंढवा (17), खडक (22), स्वारगेट (13) आदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. आंदोलकांकडून शांतता आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्यावर मुंबई कायदा अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more than 325 agitators arrested from ten places in pune city