भोरचा धोका आणखी वाढला, तालुक्यात कोरोनाचे आणखी एवढे रुग्ण 

विजय जाधव
शनिवार, 4 जुलै 2020

कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या १२ जणांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी पुण्याला पाठविले होते. त्याचा अहवाल शनिवारी सायंकाळी प्राप्त झाला. यामध्ये

भोर (पुणे) : भोर तालुक्यात शनिवारी (ता. ४) आणखी चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये भोर शहरातील एक, नाझरे गावातील एक आणि साळवडे गावातील दोन जणांचा समावेश आहे. 

पेट्रोल- डिझेलच्या दरावरून पुणेकरांना असाही दिलासा...

आज सापडलेले चौघेही या पूर्वी आढळलेल्या कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आले होते. प्रशासनाने कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या १२ जणांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी पुण्याला पाठविले होते. त्याचा अहवाल शनिवारी सायंकाळी प्राप्त झाला. यामध्ये चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, उर्वरित आठ जणांचे निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत क-हाळे यांनी दिली.  

कोंढापुरीत पर्यावराणासाठी झटताहेत ग्रामस्थ

भोर शहरात गुरुवारी (ता. २) चौपाटी परिसरातील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेले कोरोनाग्रस्त झाले आहेत. नाझरे व साळवडे येथील तिघेही कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आले होते. तालुक्यात सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या १८ झाली आहे. यामध्ये भोर शहरातील ३, नाझरे गावातील ७, साळवडे गावातील ४ आणि वरवे कंपनीतील ४, आदींचा समावेश आहे.
       

कोरोनाचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याचे एेकूनच आला हार्ट अॅटॅक
भोर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाग्रस्त सापडलेल्या गावांमध्ये आणि भोर शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतरांना फिरकू दिले जात नाही. सध्याचे वातावरण हे कोरोनाच्या विषाणूला पोषक असल्याने नागरिकांनी स्वयंशीस्त पाळून आजारापासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More corona patients grew in Bhor taluka