पुण्यात जीतोकडून ‘प्लाझमा ड्राईव्ह’; 10 दिवसांत 62 रुग्णांना दान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

JITO

पुण्यात जीतोकडून ‘प्लाझमा ड्राईव्ह’

पुणे : जीतो पुणे युथ विंगतर्फे प्लाझ्मा ड्राईव्हचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. गेल्या दहा दिवसांत 62 रुग्णांना प्लाझ्मा देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा या रूग्णांना जीवदान मिळाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत ‘प्लाझमा ड्राईव्ह’ हा उपक्रम सुरू राहणार आहे. या उपक्रमाचे औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात आले.

''जीतो पुणे संघटनेचे सर्व सदस्य समर्पणाच्या भावनेने काम करीत आहेत. खरे तर, पुणे शहराचा इतिहासच सेवाभावी वृत्तीचा आहे. त्यामुळे जीतो पुणे देखील या गौरवशाली सेवाभावी वृत्तीला जोपासत काम करीत आहे, ''असे जीतो पुणेचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका यांनी सांगितले. कोरोनाच्या संकट काळात अनेक प्रकारे काम करणाऱ्या स्वयंसेवकांचे आभार जीतो पुणेचे मुख्य सचिव पंकज कर्नावट यांनी मानले. निलेश दर्डा यांनी प्लाझमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव बाठिया यांनी केले.

हेही वाचा: रुग्णांना बेड्स देण्यासाठी दोन पुणेकरांनी सुरू केलं स्टार्ट-अप

प्लाझ्मा ड्राईव्ह उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जीतो अपेक्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, जीतो पुणेचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका, सचिव पंकज कर्नावट, सहसचिव चेतन भंडारी, जीतो पुणे युथ विंगचे अध्यक्ष गौरव नहार, मुख्य सचिव प्रितेश मुनोत, युथ विंगचे गौरव बाठिया, निलेश दर्डा, कौशभ धोका आणि युथ विंगचे सर्व सदस्य, जीतो रेस्ट ऑफ महाराष्ट्र झोनचे मुख्य सचिव अजय मेहता, सिद्धी फाउंडेशनचे संस्थापक मनोज छाजेड, अध्यक्ष ललित जैन, डायग्नोपेनचे प्रफुल्ल कोठारी, ससून रुग्णालयाचे डॉ शंकर मुगावे उपस्थित होते.

हेही वाचा: रुग्णवाहिका चालकांच्या पगारामध्ये दरमहा चार हजारांची वाढ

‘सध्याच्या कोरोनाच्या महाभयानक संकटाच्या काळात संघटनेकडून अतिशय चांगले काम होत आहे. हजारो हात एकत्र येत कोरोना रुग्णांची सेवा करीत आहेत. ज्यावेळी सार्वजनिक संकट मोठे येते त्यावेळी एकत्र येऊन सर्वांनी मुकाबला करने आवश्यक असते. या काळात कशा प्रकारे काम करावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून जीतो पुणे कडे सध्या पाहिले जात आहे.

- विजय भंडारी, राष्ट्रीय उपाध्यक्ष, जीतो अपेक्स

Web Title: More Than 62 Patient Get Plasma In Last 10 Day Due To Jito

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News
go to top