

Moshi Building Collapse: Woman Employee Recalls Five-Hour Ordeal Under Debris
esakal
Moshi Building Collapse: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपो परिसरातील इमारत ढासळल्याच्या दुर्घटनेनंतर बचावकार्य अद्याप सुरू आहे. या दुर्घटनेतून सुखरूप बाहेर आलेल्या महिला कर्मचारी सुजाता शिंदे यांनी त्या भीषण प्रसंगाचा अनुभव सांगितला. इमारत कोसळल्यानंतर काही तास ढिगाऱ्याखाली अडकल्यानंतर बचाव पथकाने केलेल्या प्रयत्नांमुळे आपले आणि सहकाऱ्यांचे प्राण वाचल्याचे त्यांनी सांगितले.