लोणी, उरुळी परिसरातील कन्टेन्मेंट झोनबाबत महत्त्वाचा निर्णय 

जनार्दन दांडगे
बुधवार, 20 मे 2020

लोणी काळभोर, उरुळी कांचन, कदमवाकवस्तीसह पूर्व हवेलीमधील बहुतांश कन्टेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) हटवले आहे.

 उरुळी कांचन (पुणे) : लोणी काळभोर, उरुळी कांचन, कदमवाकवस्तीसह पूर्व हवेलीमधील बहुतांश कन्टेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) हटवले आहे. याबाबतचे आदेश हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी बुधवारी (ता. 20) दुपारी काढला आहे. त्यामुळे उद्यापासून (गुरुवार) सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत पूर्व हवेलीमधील व्यवसायास सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

आमदार अशोक पवार, हवेली पंचायत समितीचे उपसभापती सनी काळभोर यांनी पूर्व हवेलीमधील कन्टेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) हटविण्याची मागणी हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी व हवेली पंचायत समितीचे गटविकास विकास अधिकारी प्रशांत शिर्के यांच्याकडे लेखी स्वरूपात केली होती. या मागणीनुसार बारवकर यांनी आदेश काढला आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

याबाबत हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांनी माहिती दिली की, मागील महिनाभराच्या काळात उरुळी कांचन व कदमवाकवस्तीसह पूर्व हवेलीमधील लोणीकंद गावठाण, लोणी काळभोर गावठाण, विश्वराज हॉस्पिटल परिसर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आढळले. त्यामुळे हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला होता. मात्र, या भागातील रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने व प्रतिबंधित क्षेत्राची मुदत संपल्याने वरील निर्णय घेण्यात आला आहे. 

पुणे जिल्ह्यातील या व्यवसायांना प्रशासनाची परवानगी

पूर्व हवेलीमधील लोणीकंद गावठाण, लोणी काळभोर गावठाण, विश्वराज हॉस्पिटल परिसर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन भाग कटेंन्मेंट झोनमधून बुधवारपासून (ता. 20) वगळले आहेत. त्यामुळे पूर्व हवेलीत उद्यापासून सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत व्यवसाय सुरू करता येणार आहेत. मात्र, सलून, हॉटेल, रेस्टॉरंट, बार या सारखे व्यवसाय बंदच राहणार आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Most of the containment zones in East Haveli have been removed