Video : पुण्यात कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या 'या' हॉस्पिटलमधले डॉक्‍टर, कर्मचारी रस्त्यावर...

विठ्ठल तांबे 
शनिवार, 30 मे 2020

सध्या पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा रोज वाढत आहे. या हॉस्पिटलमध्ये 80 कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तर 60 जण आयसोलेशनमध्ये आहेत. कर्मचाऱ्यांना गेली सहा महिने पगार न मिळाल्याने अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे.

धायरी (पुणे) : पुण्यात सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथे असलेल्या श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये डिसेंबर महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे पगार न मिळाल्याने आज सकाळपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात नर्स, डॉक्‍टर व इतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. 

अक्षय बोऱ्हाडे यांचा प्रवास : सायबर कॅफेतील कामगार ते सामाजिक कार्यकर्ता

सध्या पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा रोज वाढत आहे. या हॉस्पिटलमध्ये 80 कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तर 60 जण आयसोलेशनमध्ये आहेत. कर्मचाऱ्यांना गेली सहा महिने पगार न मिळाल्याने अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. मागील आठ दिवसांत गैरहजर असल्याने 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. 

भीतीची छाया आणि त्यातही पुणेकरांसाठी आली गुड न्यूज

कर्मचाऱ्यांचे गेल्या अनेक महिन्यापासून पगार नसल्याने आश्वासन दिली जातायत. त्यामुळे आज या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र, कुठल्याही प्रकारे काम बंद करण्यात आले नाही. परंतु, लवकरात लवकर पगार करण्यात यावा अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. 

 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

समाजकल्याण विभागाकडून अठरा कोटी तसेच शेवटच्या वर्षांच्या विद्यार्थ्यांचे सदतीस कोटी येणे बाकी असल्याने आम्ही पगार देऊ शकत नाही. मात्र, जसे पेमेंट जाम होतील तसे कर्मचाऱ्यांचे पगार करण्यात येतील. 
-शालिनी सरदेसाई, डीन, श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movement of nurses, doctors and staff in Navale Hospital