अठरा गावांना वाहतूकीसाठी भेडसावणारा नऊ मोरीचा प्रश्न प्रश्न तातडीने सोडविणार ; खासदार कोल्हे 

जनार्दन दांडगे
Saturday, 17 October 2020

''दौंड शहराप्रमाणेच उरुळी कांचन नागरिकांच्या सोईसाठी मोऱ्यांच्या ठिकाणी भुयारी मार्ग उभारणीसाठी आगामी अधिवेशनात रेल्वे मंत्रालयाकडे मागणी करणार असून, पुढील दोन वर्षात नऊ मोऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला जाईल'' असे कोल्हे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

उरुळी कांचन (पुणे) - पावसाळ्यात उरुळी कांचन गावातील रेल्वे रुळाच्या खाली असणाऱ्या नऊ मोरी भागात पाणी साचल्याने, सुमारे अठरा गावांना वाहतूकीसाठी भेडसावणारा हा प्रश्न तातडीने सोडविणार असल्याचे आश्वासन खासदार अमोल कोल्हे यांनी दिले. 

''दौंड शहराप्रमाणेच उरुळी कांचन नागरिकांच्या सोईसाठी मोऱ्यांच्या ठिकाणी भुयारी मार्ग उभारणीसाठी आगामी अधिवेशनात रेल्वे मंत्रालयाकडे मागणी करणार असून, पुढील दोन वर्षात नऊ मोऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला जाईल'' असे कोल्हे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

पुणे-दौंड या रेल्वेमार्गामुळे उरुळी कांचन शहर दोन भागात विभागले गेले आहे. उरुळी कांचन रेल्वे स्थानकापासून पूर्वेला पाचशे मीटर अंतरावर, रेल्वेपुलाखाली नऊ मोऱ्या असून, यातूनच नागरीकांना ये-जा करावी लागते. मात्र, पावसाळ्यात या मोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे दोनशे फुटाचे अंतर पार करण्यासाठी नागरिकांना पाच किलोमीटरचा वेढा घालून यावे लागते. दरम्यान बुधवारी (ता. १४) झालेल्या अतिवृष्ठीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार उरुळी कांचनमध्ये आले. जानाई ग्रुपचे सागर कांचन व त्याच्या सहकाऱ्यांनी कोल्हे यांना मोरीमुळे नागरीकांना सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्ठांची माहिती दिली. यावर कोल्हे यांनी वरील आश्वासन दिले. 

यावेळी नऊ मोऱ्यामुळे नागरिकांना सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्ठाबद्दल बोलतांना कांचन म्हणाले, ''पुणे-दौंड या रेल्वेमार्गामुळे उरुळी कांचन शहराचे पश्चिम व उत्तर अशा दोन भागात विभागणी झाली आहे. रेल्वेखाली दत्तवाडी, बायफ रस्ता या परिसरात पाच हजाराहून अधिक नागरीक राहतात. तर भवरापुर, अष्टापुर, टिळेकरवाडीसह उरुळी कांचनच्या उत्तर भागातील अठराहुन अधिक गावातील नागरीक शहरात ये-जा करण्यासाठी नऊ मोऱ्यांचा वापर करतात. मात्र दरवर्षी पाऊस झाला की, या मोऱ्या साचलेल्या पाण्यामुळे बंद होतात. रेल्वे प्रशासनाकडे वारंवार विनंती करुनही  मोऱ्यातील पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग काढत नाही. यामुळे नऊ मोऱ्यांच्या जागी भुयारी मार्ग झाल्यास वाहतूकीचा प्रश्न सुटेल. 

दहा हजार कोरोनामुक्त; आठवडाभरातील आकडेवारीने पुणेकरांना दिलासा 

यावेळी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषद सदस्या किर्ती कांचन, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अमित कांचन, सुभाष बगाडे, मिलिंद कांचन, राजेंद्र बाठे, अर्जुन कांचन ,संतोष कांचन, भाऊसाहेब कांचन आदींनीही रेल्वे मोरी बद्दलच्या समस्यांचा पाढा वाचला.

यावेळी नागरीकांशी बोलतांना खासदार कोल्हे म्हणाले, ''उरुळी कांचनसह सुमारे अठरा गावांना वहातुकीसाठी भेडसावणारा नऊ मोरीचा प्रश्न गंभीर असल्याचे लक्षात आले आहे. याबाबत तात्काळ रेल्वेच्या वरीष्ठ अधिकाऱ्याशी बोलुन काही उपाय-योजना करण्याबाबत सुचना दिल्या जातील. पुढील अधिवेशनात रेल्वे मंत्र्यांशी बोलुन, दौंड शहराप्रमाणे भुयारी मार्ग तयार करण्यासाठी मागणी करण्यात येईल.''

प्रेमाचं नाटक करुन फसवलं; गर्लफ्रेन्ड आणि बाळाला सोडून बॉयफ्रेन्डने काढला पळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP amol kolhe that The issue of subway under railway Bridge of urali kanchan resolved immediately