'शिवरायांच्या गुरू जिजाऊच'; पवारांच्या मताशी संभाजीराजेही सहमत, म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी केलेलं वक्तव्य हे बरोबर असून, महाराजांच्या गुरू या राजमाता जिजाऊच आहेत, शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास स्वामी नाहीत असे कोल्हापूरचे छत्रपती आणि खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. संभाजी महाराजांच्या ३४० व्या राज्यभिषेक दिनानिमीत्त ते पुण्यातील वढू बुद्रुक येथे संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी आले होते. त्यावेळी ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी केलेलं वक्तव्य हे बरोबर असून, महाराजांच्या गुरू या राजमाता जिजाऊच आहेत, शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास स्वामी नाहीत असे कोल्हापूरचे छत्रपती आणि खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. संभाजी महाराजांच्या ३४० व्या राज्यभिषेक दिनानिमीत्त ते पुण्यातील वढू बुद्रुक येथे संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी आले होते. त्यावेळी ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संभाजीराजे म्हणाले, 'शरद पवार हे आता म्हणत आहेत. मी गेल्या पंधरा वर्षांपासून मी एकच सांगतोय की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु या फक्त त्यांच्या आई जिजामाता याच आहेत. पवारांनी हे म्हटले असेल तर, मी त्याचे स्वागत करतो. जिजामाता आणि संत तुकाराम हेच शिवाजी महाराजांचे गुरु होते. तिसरा कोणताही व्यक्ती त्यांचा गुरू नाही.' रामदास स्वामी हे तर गुरू होण्याचा प्रश्नच नसल्याचेही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले.

भाजपचा मास्टरस्ट्रोक; केजरीवालांच्या विरोधात यांना उमेदवारी?

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत भारतीय जनता पक्ष कार्यालयात 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. यानंतर मोठा वादही झाला. भाजपकडून यावर नंतर स्पष्टीकरण देण्यात आले होते आणि हे पुस्तक मागे घेण्यात आले.

भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' नेत्याची निवड

शरद पवार यांचा जाणता राजा असा उल्लेख करण्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. त्यावर स्पष्टीकरण देताना शरद पवार यांनी मला जाणता राजा म्हणा असे कोणालाही म्हटलो नसल्याचे म्हटले होते. यावेळी बोलताना जाणता राजा हा शब्द रामदासांनी पहिल्यांदा वापरला असल्याचे पवारांनी म्हटले होते, तसेच शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास नसून फक्त जिजामाता याच शिवाजी महाराजांच्या गुरु असल्याचे म्हटले होते. या वक्तव्याला आज छत्रपती संभाजीराजेंनीही दुजोरा दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP chhatrapati sambhajiraje Agree with Sharad Pawar statement About shivaji maharaj Guru