esakal | उजनी होणार जल-हवाई वाहतुकीचं केंद्र; खासदार सुप्रिया सुळेंची केंद्राकडे मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Supriya_Sule

महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असणारी पंढरपूर, कोल्हापूर, तुळजापूर ही धार्मिक स्थळे जवळ आहेत.

उजनी होणार जल-हवाई वाहतुकीचं केंद्र; खासदार सुप्रिया सुळेंची केंद्राकडे मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती (पुणे) : पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या उजनी धरणाच्या जलाशयाचा वापर जल-हवाई वाहतुकीसाठी करण्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेतला आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांना भेटून सुळे यांनी या बाबतचे पत्र त्यांना दिले आहे. 

या संदर्भात सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, 
''बारामती लोकसभा मतदारसंघातील उजनीच्या जलाशयाचा वापर जल-हवाई वाहतुकीसाठी करता येणे शक्य आहे. उजनीचा जलसाठा इंग्रजी झेड या अक्षराच्या आकाराचा असून पुरेसा खोल आणि विशाल आहे. याशिवाय पाण्यावर विमाने उतरण्यासाठी आवश्यक असणारे वातावरण देखील येथे उपलब्ध आहे. 

जलसाठ्याच्या रचनेमुळे विमानांची उड्डाणे (टेक ऑफ) आणि उतरणे (लँडिंग) शक्य होईल. या जलसाठ्यापासून पुण्यातील लोहगाव येथील व्यावसायिक विमानतळ 125 कि.मी‌. अंतरावर आहे. महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असणारी पंढरपूर, कोल्हापूर, तुळजापूर ही धार्मिक स्थळे जवळ आहेत. या ठिकाणी विमानांची वाहतूक सुरू झाल्यास त्याला उत्तम प्रतिसाद मिळू शकेल.

'गुंतवणूक पुण्यातच करायची आहे'; शहर देशात टॉप-थ्रीमध्ये

तसेच जवळच्या नाशिक, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर आणि मुंबई या विमानतळांना जोडणारे ठिकाण म्हणून हा मार्ग विकसित होऊ शकेल. यासोबतच गोवा, ठाणे खाडी, साबरमती वॉटर-फ्रंट आणि सरदार सरोवर धरण येथील प्रस्तावित आणि सध्या अस्तित्वात असणाऱ्या जल-हवाई केंद्रांना जोडणारे हे ठिकाण ठरू शकेल. भिगवण येथील 'बर्ड सँक्चुरी' पासून हे अंतर पुरेसे दूर आहे. हे लक्षात घेता उजनी जलसाठ्याचा समावेश 'उडान-रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम' मध्ये करावा, अशी मागणी मी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांना केली आहे. या मागणीवर केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image