'गु्ंतवणूक पुण्यातच करायची आहे'; शहर देशात टॉप-थ्रीमध्ये

Real_Estate
Real_Estate

पुणे : कोरोनाच्या धक्क्यातून सावरत गुंतवणूकदारांनी पुन्हा आपला मोर्चा रिअल इस्टेट मार्केटकडे वळविला आहे. त्यांनी गुंतवणुकीसाठी मुंबई, बेंगलोर आणि पुणे या तीन शहरांना पसंती दिली आहे. या तिन्ही शहरांची किफायतशीर बाजारपेठ गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे, असं प्रॉपर्टी कन्सल्टंट अॅनारॉक (ANAROCK)च्या अहवालात म्हटले आहे. 

२०२०मध्ये म्हणजे कोरोनाच्या काळातही या तीन शहरांमधील बाजारपेठ सर्वात सक्रियपणे कार्यरत होती. देशातील महत्त्वाच्या सात शहरांमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी ६७ टक्के गृह विक्री आणि ६० टक्के नवीन लाँचिंग एवढा वाटा मुंबई, बेंगलोर आणि पुणे या शहरांचा राहिला आहे. 

रिअल इस्टेटसाठी देशातील सर्वात महागड्या समजल्या जाणाऱ्या शहरांमध्ये मालमत्तांच्या किंमती घसरल्याचे पाहायला मिळाले. कोविडनंतर आयटी क्षेत्रातील आलेल्या तेजीने बेंगलोर आणि पुणे शहरांतून चांगला प्रतिसाद येत असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

विशेष म्हणजे गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. इज ऑफ लिव्हिंग इंडेक्समध्ये (Ease of Living Index) बेंगलोर आणि पुणे या दोन शहरांना राहण्यासाठी सर्वात योग्य शहरे म्हणून गौरविण्यात आलं आहे. ही गोष्ट खरेदीदारांना आकर्षित करू शकते. 

स्टॉक मार्केट आणि वित्तीय क्षेत्रात सुरू असलेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सध्या गृहनिर्माण हा सर्वात सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय मानला जात आहे, असे मत अॅनारॉक प्रॉपर्टी कन्सल्टंटचे संचालक प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केलं. मालमत्तेच्या किंमती खाली आल्या आहेत, तसेच विविध ऑफर आणि सवलतींमुळे अधिग्रहणाच्या किंमतीत आणखी घट होईल. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडण्यायोग्य किंमतीत घरे खरेदी करता येतील.

त्यामुळे पुणे, मुंबई आणि बेंगलोर या शहरांमध्ये २०२१मध्ये २७ टक्के, तर पुढील आर्थिक वर्षात ५३ टक्क्यांपर्यंत घरखरेदीमध्ये गुंतवणूक केली जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

भारताच्या एकूण जीडीपीमध्ये एमएमआर (Most expensive real estate region) चा सर्वात मोठा वाटा आहे. कोरोना व्हायरससारख्या महामारीच्या काळातही रिअल इस्टेट मार्केट इतर क्षेत्रांच्या तुलनेत जास्त सक्रिय राहिले. तसेच मुंबई, पुणे आणि बेंगलोर या तिन्ही शहरांमध्ये मेट्रो, ट्रान्स हार्बर लिंक याबाबत सुरू असलेल्या विकासकामांमुळे गुंतवणुकीला पोषक वातावरण समजले जात आहे. 

अलीकडील काळात मुद्रांक शुल्कात कपात केल्याने आणि गृहकर्जाचे दर कमी करण्यात आले आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता अधिग्रहणाच्या किंमतीतही ५ ते १५ टक्के कपात करण्यात आली असल्याने याचे फायदे खरेदीदारांना होणार आहेत.

२०२० या वर्षाअखेरला एमएमआरमध्ये मालमत्तेचे सरासरी दर १०,६१० रुपये प्रति चौरस फूट होते, असे अॅनारॉकच्या संशोधनात म्हटले आहे. 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com