

MPSC aspirants await results as uncertainty affects preparation for upcoming mains exam.
sakal
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संथ कारभाराचा फटका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे. ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५’ होऊन साडेतीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, अद्याप पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला नाही.