

Sambhaji Brigade Targets MPSC Secretary Mahendra Harpalkar
esakal
MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कथित पेपरफुटी प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापले असतानाच संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या दालनात प्रवेश करून त्यांच्या तोंडाला काळे फासल्याचा प्रकार शुक्रवारी घडल्याची माहिती समोर आली आहे. संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत यांनी सहकाऱ्यांसह हरपाळकर यांच्या दालनात प्रवेश करत हरपाळकरांना काळे फासले.