
"परीक्षा तात्काळ घ्या"; MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात ठिय्या आंदोलन
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC) परीक्षा तात्काळ सुरु कराव्यात या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी पुण्यातील अलका टॉकीज चौकात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. सरकारपर्यंत आपल्या मागण्या पोहोचाव्यात यासाठी या विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला आहे. (Sit on agitation of MPSC students at Alka Chowk Pune)
हेही वाचा: जातीयवादी राजकारण करणाऱ्या राज ठाकरेंना तात्काळ अटक करा - प्रवीण गायकवाड
या आंदोलनाबाबत माहिती देताना आंदोलक विद्यार्थ्यांनी सांगितलं, "सप्टेंबरपासून आमच्या परीक्षांचं शेड्यूल जाहीर झालं आहे. पण सरकार अद्याप परीक्षा घेत नाहीए. जानेवारीमध्ये शेड्युल होतं पण अजूनही परीक्षा झालेली नाही. सगळ्या विद्यार्थ्यांनी इथं रहायचं खायचं दोन तीन महिन्यांची सोय करुन इथं आले आहेत तरी देखील परीक्षा होत नाहीए" कोर्ट राजकारण्यांसाठी रात्रीही सुनावणी घेतं मग विद्यार्थ्यांनी का घेऊ शकत नाही? असा सवालही एका विद्यार्थ्यानं उपस्थित केला आहे.
हेही वाचा: मेहुल चोक्सीच्या अडचणी वाढल्या; सीबीआयनं दाखल केला नवा गुन्हा
"सरकारला एक गोष्ट सांगायची आहे, या ठिकाणी जे विद्यार्थी आले आहेत ते गरीब, कष्टकऱ्यांची मुलं आहेत. आज महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरु आहे. भोंग्यांचा विषय सुरु आहे, बेरोजगारी सुरु आहे. कोविडमधून महाराष्ट्रच नव्हे देश सावरला आहे. एमपीएससीच्या परीक्षा वर्ष दोन वर्षे होत नसतील तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं?" असा सवालही आणखी एका विद्यार्थ्यांनं उपस्थित केलं आहे.
हेही वाचा: मनसेचं आता 'चलो अयोध्या', मुंबईत लागली पोस्टर्स
गट ब मुख्य परीक्षेची जाहिरात २०२० मध्ये आली होती. त्याची पूर्वपरीक्षा २०२१ साली झाली. मुख्य परीक्षा जानेवारीच्या २०२२ मध्ये होणार होती. पण आयोगानं तिसरी उत्तर पत्रिका जाहीर केल्यानं ही परीक्षा आत्तापर्यत प्रलंबित आहे, हे आयोगानं लक्षात घ्यावं. तसेच जे बरोबर प्रश्न होते ते रद्द न करता बरोबर देण्यात यावेत आणि यावर तोडगा काढावा, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे.
Web Title: Mpsc Students Sit On Agitation At Alka Chowk Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..